CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:45 PM 2020-07-18T14:45:21+5:30 2020-07-18T15:11:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे वाढत आहे. अनेकांना कोरोनाची लढाई जिंकली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे.
जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14,194,140 वर गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 599,416 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटना देखील समोर येत आहेत. जगभरात 8,470,275 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे वाढत आहे. अनेकांना कोरोनाची लढाई जिंकली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. ते शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. खबरदारीचे उपाय केले जात आहे.
क्वारंटाईन, लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटात आशेचा किरण दिसत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आणखी एक यश मिळालं आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ब्रिटनच्या प्रमुख फर्मसोबत मिळून 'गेम चेंजिंग' अँटीबॉडी टेस्ट किट तयार केलं आहे. या किटचं ट्रायल घेण्यात आलं असून ते यशस्वी झालं आहे.
ऑक्सफर्डच्या या किटमुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी लॅबमध्ये जाण्याची आवश्यकता देखील नाही.
टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, ऑक्सफर्डच्या या अँटीबॉडी टेस्ट (AbC-19 lateral flow test) किटला मोठं यश मिळालं आहे. या नव्या टेस्ट किटमुळे लोक घराच्या घरी चाचणी करू शकणार आहेत.
अँटीबॉडी टेस्ट किट हे 98.6 टक्के अचूक रिझल्ट देत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच जवळपास 300 हून अधिक लोकांवर या किटची चाचणी करण्यात आली आहे.
घरबसल्या टेस्ट किटच्या मदतीने लोकांना फक्त 20 मिनिटांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. या नव्या किटमुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सर जॉन बेल यांनी रॅपिड टेस्ट खूप जबरदस्त असून येत्या काही दिवसांत याला अधिकृतरित्या मंजुरी मिळू शकते असं म्हटलं आहे.
टेस्ट किट चाचणीमध्ये यशस्वी झाल्याने लाखो किट फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या असल्याचं देखील बेल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण अफ्रिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वात जास्त आहे.
कोरोनामुळे अनेक देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाने परिस्थिती भीषण होत असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली आहे.