CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:06 PM 2020-06-02T16:06:39+5:30 2020-06-02T16:17:54+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 63 लाखांवर पोहोचली आहे.
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 377,889 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,389,493 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
2,924,078 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.
कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीची आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. मुलांवरील उपचारासाठी याची गरज पडू शकते त्यामुळे शास्त्रज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.
लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या वॅक्सिन सेंटरचे संचालक आणि पिडियाट्रिक इन्फेक्शन आणि इम्युनिटीचे प्राध्यापक बिएट कॅम्पमॅन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
'हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सर्वांनी स्वत:ला विचारायला हवं. आपल्या मुलाला पुढे जाऊन लसीची गरज पडेल' असं बिएट कॅम्पमॅन यांनी सांगितलं.
'इतर सर्व लोक सुरक्षित लस विकसित करण्यासाठी मदत करत आहेत. ज्या लोकांनी हे छोटंस पाऊल उचललं आहे, त्यांचे आपण आभार मानायला हवेत' असं देखील कॅम्पमॅन यांनी म्हटलं आहे.
ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीच्या प्रयोगाच्या पुढील टप्प्यात लहान मुलांवरही या लसीचा प्रयोग केला जाणार आहे.
जूनमध्येच या लसीचं व्यापक स्तरावर ट्रायल होणार आहे. 10260 लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.
वयस्कर व्यक्तींवर याआधी या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.