CoronaVirus Marathi News Russian corona virus vaccine ahead of America and England
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:33 PM2020-08-04T15:33:26+5:302020-08-04T15:50:02+5:30Join usJoin usNext जगात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वांच्या पुढे आहे. रशिया ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरू करणार आहे. ज्या अर्थी रशिया, असा दावा करत आहे, त्या अर्थी त्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले, असेच म्हणावे लागेल. मात्र अद्याप, रशियाने केलेल्या या दाव्याची स्वतंत्र्यपणे पुष्टी झालेली नाही. पण, रशियन कोरोना लस सर्वप्रथम तयार झाली, तर भारतालाही तिचा पुरवठा होऊ शकतो. theguardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार, 10 ऑगस्टपर्यंत मुख्य लसीला मंजुरी देण्यात येईल, असे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय भारत, ब्राझील आणि सौदी अरेबियासारख्या देशांना लसीची विक्री करण्याचीही रशियाची इच्छा आहे. रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की भारतासह या देशांनीही त्यांची लस घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रशियाने म्हटले आहे, की ते सप्टेंबर महिन्यापासून लसीच्या उत्पादनाला सुरुवात करणार असून, ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात केली जाईल. विशेष म्हणजे, लसीच्या परीक्षणादरम्यान संशोधकांनीही ही लस टोचून घेतली होती. इंग्लंड आणि अमेरिकेच्या कोरोना लसीच्या परीक्षणासंदर्भात बरीच माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, रशियन लसीच्या बाबतीत फारशी माहिती समोर आलेली नाही. वृत्तांमध्ये असेही म्हटले जात आहे, की एक रशियन लस देशातील श्रीमंत लोकांना मिळायलाही सुरुवात झाली आहे. रशियाचे व्यापार मंत्री डेनिस मॅन्तुरोव यांनी म्हटले आहे, की एका महिन्यात रशिया लसीचे लाखो डोस तयार करू शकतो. एक कंपनी रशियात तीन ठिकाणी उत्पादनाची तयारी करत आहे. यापूर्वी, रशियाचे आरोग्य मंत्री मिखैल मुराश्को यांनी म्हटले होते, की क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. आता केवळ कागदी प्रक्रिया सुरू आहे. Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्यारशियाअमेरिकाइंग्लंडभारतव्लादिमीर पुतिनcorona virusrussiaAmericaEnglandIndiaVladimir Putin