CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 09:24 AM 2020-06-29T09:24:26+5:30 2020-06-29T09:43:50+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला. ‘वल्डोमीटर’ने केलेल्या मोजणीनुसार हा आकडा आता एक कोटी 45 एवढा झाला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या महामारीचा सर्वप्रथम उगम झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत या व्हायरसचा प्रचंड प्रसार झाला आहे.
उन्हाळा सुरू झाला की साथीचा जोर कमी होईल हा जाणकारांनी व्यक्त केलेला अंदाजही खोटा ठरला. एक कोटी बाधितांपैकी सुमारे 75 टक्के रुग्णांना मे आणि जून या गेल्या दोन महिन्यांत संसर्ग झाला.
जूनमध्ये जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज सरासरी 1.25 लाखांनी वाढ झाली आहे. बहुतेक सर्वच देशांनी एक ते तीन महिन्यांचे ‘लॉकडाऊन’ लागू केले.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
जगभरातील संशोधक दिवस-रात्र कोरोना संबधित माहितीवर काम करत आहे. कोरोनाचा संसर्ग नेमका कसा होतो. तो शरीरात कसा पसरतो यावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे.
शरीरात कोरोना कसा पसरतो याचा शोध लावल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जीन-एडिटिंग टूल (CRISPR-Cas9) च्या मदतीने त्यांनी हा शोध लावल्याची माहिती मिळत आहे.
संशोधकांना कोणते जीन्स शरीरात कोरोनाचा प्रसार करतात याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आफ्रीकन ग्रीन माकडाच्या शरीरात ते सेल्स टाकून त्यावर अभ्यास केला आहे.
संशोधकांना यामधून शरीरात कोणते जीन्स प्रो व्हायरल म्हणजेच व्हायरसचा प्रसार करण्यासाठी मदत करतात आणि कोणते अँटी व्हायरल म्हणजेच व्हायरसचा सामना करतात याची माहिती मिळाली आहे.
मानवाच्या शरीरावर व्हायरसचा कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करून लस निर्माण केल्यास त्याचा अत्यंत फायदा होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
संशोधनामध्ये शरीरात व्हायरसचा प्रसार कसा होतो, कोणते जीन्स मदत करतात. त्याचा मार्ग कसा असतो याबाबत माहिती मिळाली आहे. यात प्रोटीनची भूमिका ही अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जातं.
प्रोटीनचं एक रूप व्हायरला वाढवण्यासाठी मदत करतं तर दुसरं रुप हे त्याला रोखण्यास उपयुक्त ठरतं. अभ्यासानुसार, ACE2 रिसेप्टर आणि Cathepsin L प्रोटीन संसर्गाचा प्रसार करतं तर हिस्टोन प्रोटीन हा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करतं.
स्कूल ऑफ मेडिसिन, बोर्ड इन्स्टिट्यूट आणि MIT आणि हावर्ड यूनिव्हर्सिटीने मिळून हे संशोधन केल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तुवालू, वानुआतू वसॉलोमन आयलँड्स यासारख्या छोट्या बेटांसह एकूण 38 देशांनी अनेक महिन्यांच्या लढ्यानंतर या साथीवर पूर्ण मात केली आहे.
न्यूझीलंडनेही कोरोनावर मात केल्याचे जाहीर केले. पण तेथेही नंतर काही नवे रुग्ण आढळले होते. श्रीलंकेने आता तेथे एकही नवा रुग्ण नसल्याचे म्हटले आहे तर भूतानमधील रुग्णसंख्या फक्त सातवर आली आहे.