CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:29 AM2020-06-22T09:29:58+5:302020-06-22T09:46:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात आणखी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे. 81 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत 470,703 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 9,046,208 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 4,838,345 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

कोरोनाच्या संकटात आणखी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे. 81 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 9 लाखांवर गेली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी बीजिंगमध्ये नवीन प्रकरणं समोर येत आहेत.

अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, इस्रायल, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील इत्यादी देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला आहे. फक्त 36 देशांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं कमी झाली आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक देशांमध्ये अनलॉकमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी असलेल्या नियमांचं नागरिक उल्लंघन करत आहेत. मास्कही नीट लावत नाही. त्यामुळे या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यात संक्रमण झपाट्याने वाढल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकी देशांची परिस्थिती आणखीन खराब होण्याची शक्यता असल्याचं देखील टेड्रोस गेब्रेयसेस यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात गेल्या चोवीस तासांमध्ये 15 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 4 लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासांत 306 जणांचा बळी गेला. त्यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 13 हजारांहून अधिक झाली आहे.

देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यानंतर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या देशात अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पूर्णपणे बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या वर आहे. एकूण रुग्णांपैकी 55 टक्के लोक या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

Read in English