CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:26 AM 2020-07-19T11:26:03+5:30 2020-07-19T11:50:17+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मच्छर चावल्याने खरंच कोरोना होतो का? याबाबत आता नव्या रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्यावर गेली आहे. अनेक ठिकाणी उद्रेक झाला आहे.
कोरोनामुळे जगभरातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी काही देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या मनात कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. मच्छर चावल्याने कोरोणाची लागण होते अशी चर्चा रंगली होती.
मच्छरमुळे कोरोनाचा संसर्ग होतो?, एखादा डास कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर इतर व्यक्तींना चावला तर इन्फेक्शन होतं का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
मच्छर चावल्याने खरंच कोरोना होतो का? याबाबत आता नव्या रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.
मच्छरमुळे कोरोनाची लागण होत नाही अशी माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याआधी मच्छरबाबत अशीच माहिती दिली होती.
रिसर्चनुसार, कोरोनाचा संसर्ग पसरवणारा SARS-CoV-2 व्हायरस मच्छर चावल्याने होत नाही. त्यामुळे मच्छर चावल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही.
एडीज एजिप्टी, एडीस अल्बोपिक्टस आणि क्यूलेक्स क्विनकॅफॅसिअसस या मच्छरांच्या तीन प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. मच्छरांच्या या तीनही प्रजाती आहेत.
रिसर्चमधून मच्छरबाबत महत्त्वाची माहिती समोर आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 26,816 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.