CoronaVirus Marathi News two metre social distancing rule outdated science says researcher
CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 05:13 PM2020-08-26T17:13:14+5:302020-08-26T17:27:32+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरससंदर्भात जगभरात सोशल डिस्टंसिंगचे नियम तयार करण्यात आले आहेत. तसेच लोकांनी एकमेकांपासून 2 मीटरचे अंतर पाळावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, आता अभ्यासानंतर संशोधकांनीच या नियमासंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हा जुन्या विज्ञानावर (Outdated Science) आधारलेला नियम असल्याचेही म्हटले आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांचे म्हणणे आहे, की सर्वच स्थितीत सोशल डिस्टंसिंगचा एकच नियम करण्याऐवजी, वेग-वेगळ्या वातावरणासाठी वेगवेगळे नियम असायला हवेत. संशोधकंनी यासंदर्भा, मेडिकल जर्नल The BMJ मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. संशोधकांनी म्हटले आहे, की वेगवेगळ्या वातावरणात सोशल डिस्टंसिंगचे वेगवेगळे नियम असले, तर हाय रिस्क वातावरणात राहणारे लोक स्वतःला अधिक सुरक्षित समजतील. तसेच इतर भागांत राहणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळेल. या दृष्टीने विचार केला तरच आपल्याला सर्वसाधारण परिस्थितीकडे वाटचाल करता येईल. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की दोन मीटर अंतर सुरक्षित असल्याचे सर्वप्रथम 1897 मध्ये सांगण्यात आले होते. त्याला आता 123 वर्ष झाले आहेत. वैज्ञानिकांनी लिहिली आहे, की इनडोर, आउटडोर, व्हेंटिलेंशन असताना अथवा व्हेंटिलेशन नसताना, मास्क असताना अथवा मास्क नसताना आणि संबंधित अॅक्टिव्हिटीच्या आधारे सोशल डिस्टंसिंगसाठीचे अंतर वेगवेगळे असायला हवे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एक अथवा दोन मीटरचा नियम, हा विज्ञानाच्या काही नियमांवर आधारलेला होता. ते बरोबर असण्याचीही एक मर्यादा आहे. मात्र, या नव्या संशोधनातून समोर आले आहे, की शिंक अथवा कफातून ड्रॉपलेट 8 मीटरपर्यंत पसरू शकतात.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याडॉक्टरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusdoctorCoronavirus in Maharashtra