CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:52 PM 2020-05-08T12:52:00+5:30 2020-05-08T13:22:52+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळ्यांमधूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 270,740 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 39 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,917,999 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,344,278 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळ्यांमधूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
हाँगकाँग विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनामध्ये डोळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असा दावा केला आहे.
सार्सच्या तुलनेत कोरोना व्हायरस हा 100 पटीने अधिक वेगाने डोळ्यांच्या माध्यमातून शरीरामध्ये पसरत आहे, असा दावाही संशोधकांनी केला आहे.
द लान्स रेस्पीरेट्री मेडिसीन या जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार डॉक्टर मायकल चान यांच्या नेतृत्वाखाली हाँगकाँग विद्यापीठामध्ये संशोधकांचा एक गट संशोधन करत आहे.
संशोधनातून डोळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग हा अधिक होऊ शकतो असा दावा डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टर मायकल चान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोरोना डोळ्यांच्या माध्यमातून शरीरामध्ये सार्सच्या व्हायरसपेक्षा अधिक वेगाने प्रवेश करतो असं आमच्या लक्षात आलं. तसेच संसर्गाचा वेग हा इतर व्हायरसपेक्षा 80 ते 100 पटीने अधिक आहे असंही चान यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी डोळे हा महत्त्वाचा स्त्रोत असल्याचं त्यांनी सांगितलं. डोळ्यांमार्फत होणारा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी डोळ्यांना कमीत कमी हात लावावा.
काही मिनिटांनी सतत आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डोळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिक असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे.