CoronaVirus Marathi News why we might not get a corona virus vaccine soon sna
यामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन? वैज्ञानिकांनी सांगितले असे काही... By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 05:31 PM2020-05-26T17:31:57+5:302020-05-26T17:43:13+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरस संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. असे असताना कोरोनावरील व्हॅक्सीन यायला आणखी किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे. सर्वसामान्य जीवन पूर्ववत होण्यासाठी आता हाच एकमेव मार्ग लोकांकडे उरला आहे. या पार्श्वभूमीवर, इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक म्हणाले, या व्हॅक्सीनसाठी इंग्लंड कंबरकसून काम करत आहे. व्हॅक्सीनचे ट्रायल लॉन्च करण्यात आले आहेत. व्हॅक्सीन तयार करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टदेखील साइन झाले आहेत. पुढील टप्प्यात ऑक्सफर्ड 10,000 हून अधिक व्हॉलंटिअर्सवर प्रयोग करणार आहे. मंत्री आणि सल्लागार याकडे अधिक गांभिर्याने पाहत आहेत. यामुळे फेल होऊ शकते व्हॅक्सीन? इंग्लंडचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी जोनाथन वॅन टाम यांनी काही दिवसांपूर्वी, असे शब्द उच्चारले होते, जे एकण्याची कुणाचीही इच्छा नव्हती. ते म्हणाले होते, 'व्हॅक्सीन मिळेलच, हे आम्ही खात्रीने सांगू शकतन नाही.' खरेतर ते त्यांच्या ठिकाणी अगदी बोरबर होते. व्हॅक्सीन सिद्धांतात सोपी असते. मात्र, व्यवहारात ती तेवढीच जटिल असते. एक आदर्श व्हॅक्सीन केवळ इंफेक्शनपासूनच बचाव करत नाही, तर ती संक्रमणही थांबवते आणि सुरक्षितही असते. खरे तर ती तयार करणे बातम्यांमध्ये दिसते, तेवढे सोपे नसते. वैज्ञानिकांना एचआयव्हीसंदर्भात माहिती होऊन 30हून अधिक वर्षे लोटली आहेत. मात्र, अद्यापही एड्सवरील व्हॅक्सीन तयार झालेली नाही. डेंग्यू तापाचे कारण बनणाऱ्या व्हायरसची ओळख 1943मध्येच झाली होती. मात्र, गेल्या वर्षीच त्याच्या पहिल्या व्हॅक्सीनला मंजुरी मिळाली. मम्प्स नावाच्या एका आजाराची व्हॅक्सीन तयार व्हायला जवळपास चार वर्षे लागली होती. वैज्ञानिक कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन तयार करण्याच्या कामाला फार पूर्वीपासूनच लागले आहेत. Sars आणि Mers नावाच्या दोन कोरोना व्हायरसनी यापूर्वीही बरेच नुकसान केले आहे. तेव्हापासूनच याच्या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र, अद्याप कुणालाही परवाना मिळालेला नाही. काही वेळानंतर Sars अपोआपच नष्ट झाला आणि Mers मध्य आशियातच संपला. मात्र, कोरोना व्हॉयरसवरील व्हॅक्सीन तयार करत असलेल्या वैज्ञानिकांना याचा फायदा निश्चित पणे होईल. मात्र, व्हायरससंदर्भात जाणून घेण्यासाठी बरेच काही आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकतेच कोरोनाबाधित रुग्णांच्या रक्ताचे विश्लेषण केले. यात, आयजीजी अँटीबॉडीचा स्तर रुग्णाची इम्यूनिटी चांगली करण्यासाठी मदत करतो, असे त्यांना आढळून आले. मात्र, पहिल्या महिन्यानंतर याचा सक्सेस रेट खाली आला. युनिव्हर्सिटी ऑफ लोवातील संशोधक स्टॅनली पर्लमॅन म्हणतात, 'हे आव्हानात्मक आहे. जर नैसर्गिक संसर्गात तुम्हाला कुणी अधिक इम्युनिटी देऊ शकत नाही आणि जर एखादा गंभीर आजार असले, तर त्यात एक व्हॅक्सीन काय करणार? हे बरोहर होऊ शकते, मात्र, यासंदर्भात आम्हाला माहीत नाही.' जर व्हॅक्सीन एखाद्या व्हॉयरसपासून आपल्याला वर्षभर वाचवू शकली तर निश्चितच हा काही काळ आपल्या सोबत राहील. यादरम्यान एखाद्या व्हॉयरसची अनुवांशिक स्थिरतादेखील फार महत्वाची असते. इंफ्लूएंजा सारखा व्हॉयरस फार वेगाने आपले रूप बदलतो. यामुळेच व्हॅक्सीन डेव्हलपर्सना दरवर्षी यासाठी एक नवा उपाय शोधावा लागतो. यामुळेच आजवर वैज्ञानिकांना एचआयव्हीवरील व्हॅक्सीनही तयार करता आलेली नाही. सर्वच व्हायरसप्रमाणे कोरोना व्हायरसदेखील फार वेगाने आपले रूप बदलतो. व्हॉयरसच्या प्रोटीनमध्येही काही अनुवांशिक बदल दिसून आले आहेत. जे व्हॅक्सीन तयार करण्यासाठी उपयुक्त असतात. जर व्हायरस प्रोटीनमध्ये एवढा वेगाने बदल होत राहीला, तर संक्रमणावरील व्हॅक्सीनचा परिणाम कमी होऊ शकतो.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याविज्ञानडॉक्टरवैद्यकीयऔषधंcorona virussciencedoctorMedicalmedicines