CoronaVirus Marathi News will a miraculous corona virus vaccine remain the dream
CoronaVirus News: ...तर फक्त स्वप्नच बनून राहणार 'चमत्कारिक' कोरोना व्हॅक्सीन? अतिघाई पडेल महागात By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 11:09 AM2020-05-31T11:09:21+5:302020-05-31T12:36:17+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हातपाय पसरले आहेत. महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही त्याच्या समोर नतमस्तक झाली आहे. अशातच इस्रायलच्या संरक्षण प्रयोगशाळेने कोरोनाची अॅन्टीबॉडी विकसित केल्याचा, तर इटलीतील दोन वैज्ञानिकांनी कामचलाऊ व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील काही संशोधकांच्या नेतृत्वातही व्हॅक्सीनचे मानवावर परीक्षण केले जात आहे. गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि भारतातही एक-दो व्हॅक्सीनचे प्राथमिक स्थरावर मानवावर परीक्षण करण्यात येत आहे. असे असतानाच काही दिवसांपूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी शंका व्यक्त केली होती, की कदाचीत आपण लवकर कोरोनाविरोधात व्हॅक्सीन तयारही करू शकणार नाही. बोरीस यांच्या या विधानावर त्यांच्या वैज्ञानिक सल्लागारांनीही सहमती दर्शवली होती. अनेक संशोधकांचे म्हणणे आहे, की आपल्याला कोरोना व्हायरससोबतच जगायची सवय लावावी लागेल. यामुळे व्हॅक्सीन होऊ शकते फेल - व्हॅक्सीन तयार करणे हे अतिशय गुंतागुंतीचे आणि तांत्रिक स्वरुपाचे काम आहे. मुख्यत: व्हॅक्सीनचे कार्य संसर्ग शरीरात जाण्यापासून रोखणे, त्याचा प्रसार थांबवणे आणि कमीतकमी हानी करणे, असे असते. हे तिन्हीही कामे सुरक्षितपणे व्हायला हवीत. गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही व्हॅक्सीनचा साइड इफेक्ट गंभीर आणि व्यापक स्वरुपाचा असतो. कोरोनाविरोधात विकसित केल्या जाणाऱ्या व्हॅक्सीनसंदर्भातही याचा अभ्यास करून ती तयार करावी लागेल. असे मानले जाते, की व्हायरसचा खात्मा करण्यासाठी व्हॅक्सीन वेगाने अँटीबॉडीज तयार करेल. तसेच टी सेल संक्रमित पेशींचाही खात्मा करेल. प्रत्येक व्हॅक्सीन दुसऱ्या व्हॅक्सीनच्या तुलनेत भीन्न असते. टी सेलमध्ये वेगाने होणाऱ्या वृद्धीचाही धोका आहे. यामुळे व्यक्तीला जीवघेण्या कॅन्सरलाही सामोरे जावे लागू शकते. बदलाचा/परिवर्तनाचा गोंधळ - कोरोना व्हायरसमध्ये आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनला निशाणा बनवण्यावर संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र यातही बदल अथवा परिवर्तन होत आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये झालेल्या संशोधनात याचे ठोस पुरावेही मिळाले आहेत. कोरोनाने प्रत्येक देशात आपले रूप बदलले आहे. त्यात आतापर्यंत तीन मोठे बदल झाले आहेत. व्हॅक्सीन बनवणे एक मोठे आव्हान - एचआयव्हीची ओळख साधारणपणे 30 वर्षांपूर्वी झाली आहे. मात्र, आजवर एड्सला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन तयार झालेली नाही. 1943मध्ये डेंग्यू तापासाठी जबाबदार असलेल्या व्हायरसची ओळख पटली. मात्र, यावरील पहिल्या व्हॅक्सीनला गेल्यावर्षीच परवानगी मिळाली आहे. याशिवाय काही बाबतीत व्हॅक्सीन फेलही झाली आणि संक्रमण अनेक पटींनी वाढले. तसेच सार्स आणि मर्सवरील व्हॅक्सीनही आजवर तयार होऊ शकलेली नाही. केवळ कामचलाऊ व्हॅक्सीन मिळवली जाऊ शकते - जागतीक इंफ्लुएंझा केंद्र फ्रान्सिस क्रिक इंस्टिट्यूटचे जॉन मॅककुले यांनी सांगितले, की प्रत्येक व्हॅक्सीनचे आव्हान जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. यात आपल्याला प्रत्येक बिंदूचा अभ्यास करावा लागतो. प्रत्येक व्हॅक्सीनसोबत हे करावे लागते. मॅककुले म्हणाले, अम्हाला अद्याप कोरोना व्हायरसची पूर्णपणे माहितीच मिळालेली नाही. एवढेच नाही, आम्हाला यातील घटकही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. मात्र, आम्ही काही तरी निश्चितपणे मिळवू, जे कामचलाऊ असेल. कोरोना फॅमिलीची प्रतिइम्युनिटी अद्याप विकसित झालेली नही - कोरोनाविरोधातील व्हॅक्सीन विकसित करण्यातील मुख्य चिंता अँटीबॉडीची आहे. कोरोनाविरोधात इम्युनिटी स्थीर नाही. मानवाला होणाऱ्या सर्वसामान्य सर्दी-तापाच्या एक चतुर्थांश केसेससाठी कोरोना कुटुंबातील व्हायरसच जबाबदार आहेत. दरवर्षी सरासरी लोकांमध्ये सर्दी-ताप येतच असतो. आजपर्यंत जुन्या कोरोना व्हायरसविरोधातही इम्युनिटी विकसित झालेली नाही. घाई पडेल महागात - व्हॅक्सीन विकसित करण्याच्या घाईत सुरक्षितता पणाला लावली जाऊ शकत नाही. 100हून अधिक संशोधन केंद्रांमध्ये कोरोनावरील व्हॅक्सीन विकसित करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. औषधी आजारी लोकांना दिली जाते. तर व्हॅक्सीन स्वस्थ लोकांना दिली जाते. त्यामुळे व्हॅक्सीनमध्ये झालेली एक छोटीशी गडबड कोट्यवधी लोकांना आजारी पाडू शकते. डब्ल्यूएचओ आणि जिनेव्हा अलायन्स फॉर व्हॅक्सीननेही यासंदर्भात इशारा दिला आहे. कोरोनाच्या एका प्रोटीनला निशाणा बनवण्याच्या नादात आपल्या पेशींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. चेन तोडण्यासाठी होईल मदत : कामचलाऊ व्हॅक्सीन कोरोनाला कमजोर नक्कीच करू शकते. मात्र, वृद्धांसाठी परिस्थिती खराबच राहील, पण, युवावर्ग जबरदस्त इम्युनिटीसह पुढे येईल. याचा कोरोनाची चैन तोडण्यास मदत होईल. जॉन मैककुले म्हणतात, हा एक मार्ग आहे. आपण इम्युनिटी टाकू शकत नाही, तर ती वाढवावी लागेल.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकाइस्रायलइंग्लंडभारतडॉक्टरसंशोधनcorona virusAmericaIsraelEnglandIndiadoctorResearch