CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:50 AM 2020-05-28T10:50:44+5:30 2020-05-28T11:00:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना जपानमधील आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालू नका असा सल्ला दिला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 357,467 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,792,253 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दीड लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरण्याचा सल्ला जगभरातील तज्ज्ञ देत आहेत. अनेक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
काही देशांमध्ये मास्क वापरणं अनिवार्य असून न घातल्यास हजारो रुपयांचा दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना जपानमधील आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालू नका असा सल्ला दिला आहे.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं असं जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांना सावध केलं आहे
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यांना समस्या उद्भवू शकतात अशी सूचना जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांसाठी जारी केली आहे.
2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं बंद करा. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो. मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो असं त्यांनी म्हटलं आहे.
मास्कमुळे मुलांच्या हृदयावर ताण येऊ शकतोस, तसेच हिट स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो, अशी सूचना या पालकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसची गंभीर प्रकरणं ही चिमुकल्यांमध्ये अगदी कमी आहेत. बहुतेक लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच कोरोनाची लागण झालेली आहे.
शाळा किंवा डे केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनदरम्यान लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. याच दरम्यान काही लहान मुलं ही घर सोडून पळून जाऊ लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये मुलं आपल्या पालकांकडे असे काही हट्ट करत आहेत जे लॉकडाऊनमध्ये पूर्ण करता येऊ शकत नाही. त्यामुळेच मुलं पळून जाण्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.