CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:18 PM 2020-04-25T15:18:32+5:30 2020-04-25T16:30:35+5:30
मक्केमध्ये तेथील काही मौलाना आणि सेवक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी नमाज अदा केला. मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान यंदा सुनासुना जाणार आहे. जगभरात कोरोनाचे संकट असल्याने त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्केमध्येही चिटपाखरू दिसत नाहीय.
आज मक्केमध्ये तेथील काही मौलाना आणि सेवक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी नमाज अदा केला.
मुस्लिमांचे पवित्र स्थळ काबामध्ये रमजानच्या पहिल्या दिवशी नमाज अदा करण्यात आला. मात्र, इतर दिवशी असलेली गर्दीही तिथे नव्हती. कोरोनामुळे धार्मिक यात्रेवर बंदी आणण्यात आली आहे.
काबामध्ये जे लोक दिसत आहेत ते येथे काम करणारे कर्मचारी आहेत.
युएईमध्येच नाही तर भारतातही जामा मशीद सुनीसुनी वाटत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे टाळले आहे. मौलवींनीही त्यांना घरातूनच नमाज पठण करण्यास सांगितले आहे.
कोरोना व्हायरसमुळे जम्मू काश्मीरमध्येही मशीदी बंद होत्या.
भारतात लॉ़कडाऊन आहे. यामुळे आधीच जाहीर केले होते की धार्मिक स्थळे बंदच ठेवली जाणार. यामुळे पहिल्या दिवशी दिल्लीच्या जामा मशीदीमध्ये कोणीही आले नव्हते.
हा फोटोदेखील तुर्कस्थानचाच आहे. गेल्या वर्षी येथे पंगती उठत होत्या. आज तिथे कोणीही नाहीय.
तुर्कस्थानची निळी मशीदचा हा फोटो पाहा. २४ एप्रिल २०२० ला ही एकदम रिकामी जागा होती. जून २०१६ मध्ये रमजानमध्ये सैन्याच्या जवानांनी तोफ डागून रोजा सुरु झाल्याची माहिती दिली होती.
जामा मशीदीचा एरिअल व्ह्यू.