coronavirus new cases declined last week says who
CoronaVirus News: लवकरच कोरोनाचा खेळ खल्लास? WHOनं दिलेल्या गुडन्यूजनं जगाला दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:34 PM2021-10-06T20:34:10+5:302021-10-06T20:36:47+5:30Join usJoin usNext CoronaVirus News: कोरोना संकटात जगाला सर्वात मोठा दिलासा गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र अद्यापही कोरोनाचं संकट संपलेलं नाही. कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून येत असल्यानं धोका कायम आहे. या संकटात आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. त्यामुळेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. लसीकरण वाढल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. संपूर्ण जगावरील कोरोना संकट कायम आहे. मात्र या संकटाची तीव्रता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. जागतिक स्तरावर ऑगस्टपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. हा सिलसिला ऑक्टोबरमध्येही कायम आहे. त्यामुळे कोरोना संकटातून जाणाऱ्या जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ३१ लाख होती. त्यात आता ९ टक्क्यांची घट झाली आहे. या कालावधीत जगभरात जवळपास ५४ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. युरोप वगळता जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आफ्रिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक ४३ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. पश्चिम आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील रुग्णसंख्येत २० टक्क्यांची घट झाली आहे. अमेरिका आणि पश्चिम पॅसिफिक भागातील कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. जवळपास एक तृतीयांश आफ्रिकन देश डिसेंबरच्या अखेरपर्यंत आपल्या किमान १० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करतील, असा WH0चा अंदाज आहे. देशातील १८ वर्षांवरील ७० टक्क्यांहून अधिक जणांना कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. तर २५ टक्क्यांहून अधिक जणांचं लसीकरण पूर्ण होणार आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus