CoronaVirus News : एका रॅलीमुळे अडीच लाख लोक सापडले कोरोनाच्या विळख्यात! By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:26 PM 2020-09-09T13:26:41+5:30 2020-09-09T14:50:52+5:30
अमेरिकेत एका बाईक रॅलीमुळे जवळपास दोन लाख ६० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. एका रिसर्च ग्रुपच्या स्टडीनंतर ही माहिती समोर आली आहे. यात संशोधकांनी ६३ पानांच्या अहवालात संपूर्ण प्रकरणाची माहिती सविस्तरपणे दिली आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने संशोधनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे मोटारसायकल रॅली काढली होती. यानंतर, कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढल्यानंतर सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याची स्टडी केली.
यावेळी रॅलीमुळे कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आकडेवारी स्थानिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीपेक्षा स्टडीमध्ये मांडली गेली.
अमेरिकेच्या साऊथ डकोटा राज्याचे गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांनी या स्टडीला 'कल्पना' म्हटले आहे. तसेच, ज्या पत्रकारांनी हा अहवाल दिला, त्यांच्यावरही त्यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे. दरम्यान, सुपर-स्प्रेडर इव्हेंटने आणखी किती लोक संक्रमित होऊ शकतात? याचा शोध घेणे या स्टडीचे लक्ष्य होते.
यापूर्वी, संशोधकांनी अमेरिकेतील इतर निदर्शने आणि रॅलीची स्टॅडी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या राजकीय रॅलीची स्टडी सुद्धा जूनमध्ये करण्यात आली होती.
संशोधकांनी स्टडीदरम्यान मोबाईल फोन डेटाचा वापर केला आणि रॅलीच्या आधी आणि नंतरच्या घटनांचा तपास केला. ७ ते १६ ऑगस्ट दरम्यान ही रॅली घेण्यात आली होती, ज्यात ४ लाखाहून अधिक लोकांनी भाग घेतला होता.
या रॅलीचा स्थानिक सरकारला आर्थिक फायदा झाला. मात्र, आरोग्यावर जो खर्च येत आहे, त्याचा मोठा हिस्सा अमेरिकेचे केंद्र सरकारला द्यावा लागत आहे, असे या स्टडीमधील लेखक अँड्र्यू फ्रीडसन म्हणाले.
तर गव्हर्नर क्रिस्टी नोम यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक संशोधनाच्या नावाखाली केलेल्या या स्टडीनुसार त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा उपयोग करून मोर्चात भाग घेणाऱ्या लोकांवर हल्ला होत आहे.
स्थानिक आरोग्य विभागाने मंगळवारपर्यंत या मोर्चात केवळ १२४ लोकांनाच संसर्ग झाल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर असोसिएटेड प्रेसने गेल्या आठवड्यात आपल्या अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत रॅलीसंदर्भात २९० कोरोना प्रकरणांची ओळख पटली आहे.
स्टडीमध्ये संशोधकांनी तपासणी केली की ज्या परिसरातून अधिक लोक रॅलीमध्ये गेले. त्या परिसरातून किती कोरोना रुग्णांची नोंद झाली.
या स्टडीचे लेखक अँड्र्यू फ्रीडसन यांनी सांगितले की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून आम्ही कधीही रॅलीत सामील झालेल्या सर्व संक्रमित लोकांचा शोध घेऊ शकणार नाही. यासाठी यावेळेचा आकडा सर्वात योग्य आहे.