CoronaVirus north korean coronavirus victims dying due to starvation in secret camps
CoronaVirus News: कोरोना रुग्णांना उपाशी ठेवतोय 'हा' देश; गुप्त विलगीकरणात अनेकांचा मृत्यू By कुणाल गवाणकर | Published: November 3, 2020 04:49 PM2020-11-03T16:49:55+5:302020-11-03T17:09:42+5:30Join usJoin usNext जगातील कोरोना रुग्णांचा आकडा पावणे पाच कोटी लाखांच्या जवळ पोहोचला आहे. तर मृतांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनानं आधी युरोप, अमेरिकेनंतर भारतात धुमाकूळ घातला. भारतात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या चार आठवड्यांपासून लक्षणीय घट झाली आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ब्रिटनसह काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चीनचा शेजारी असलेल्या उत्तर कोरियानं मात्र कोरोनाचा सामना करताना धक्कादायक गोष्टी केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव झालाच नसल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियाची गुपितं आता उघड होऊ लागली आहेत. उत्तर कोरिया कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना उपाशी ठेवून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचं वृत्त साऊन चायना मॉर्निंग पोस्टनं दिलं आहे. उत्तर कोरियानं चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात विलगीकरण केंद्रं तयार केल्याची माहिती दक्षिण कोरियात काम करणारे ख्रिस्ती कार्यकर्ते टिम पीटर्स यांनी दिली आहे. आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना कोणतेही वैद्यकीय उपचार दिले जात नाहीत. त्यांना जेवण देताना कुटुंबीयांनादेखील अडथळे येतात, अशी माहिती पीटर्स यांनी दिली. उत्तर कोरियातील कोरोना रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांना सरकारकडून अतिशय अपुरं अन्न आणि औषधोपचार मिळतात. कित्येकांना तर तेही मिळत नाहीत, असं पीटर्स यांनी सांगितलं. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या कित्येक जणांचा मृत्यू झाल्याचा दावादेखील पीटर्स यांनी केला. उत्तर कोरियातल्या ४० टक्के लोकसंख्येला पुरेसं अन्न मिळत नसल्याचा संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus