Omicron Variant : चिंता वाढली! 5 वर्षांखालील मुलांवर अॅटॅक करतोय Omicron? यावेळी दिसतोय वेगळाच ट्रेंड! वैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:53 AM 2021-12-04T10:53:39+5:30 2021-12-04T11:06:33+5:30
Coronavirus Omicron variant : Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 रुग्ण समोर येत होते. आता दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावेळी 5 वर्षांखालील मुलांमध्येही झपाट्याने संसर्ग वाढत आहे. सर्व मुलांना ओमिक्रॉनची लागण झाली नसली तरी, मुलांमध्ये संसर्ग वाढल्याने चिंताही वाढली आहे.
Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 रुग्ण समोर येत होते. मात्र, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी लहान मुलांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD)च्या Dr Waasila Jassat यांनी म्हटले आहे की, 'कुठल्याही व्हारसमध्ये मुलांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. या आधीच्या साथींच्या रोगांमध्येही असेच दिसून आले आहे. मात्र, तिसर्या लाटेत, 5 वर्षांखालील मुले आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच, आता चौथ्या लाटेत सर्व वयोगटांत, विशेषत: 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे.'
'यावेळी दिसतोय काहीसा वेगळा ट्रेंड' - Dr Waasila Jassat म्हणाल्या, 'अद्यापही मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. मात्र, 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ते अधिक वेगाने वाढत आहे. 60 वर्षांवरील वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 5 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. यावेळी काही वेगळे ट्रेंडदेखील बघायला मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.
एनआयसीडीशी संबंधित असलेल्या डॉ. मिशेल ग्रूम यांनीही अशीच चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, लहान मुलांमध्ये संसर्ग एवढ्या झपाट्याने का पसरत आहे, यावर संशोधन करण्यात येईल. यासंदर्भात सध्या काहीही बोलणे घाईचे होईल. एवढेच नाही, तर ते असेही म्हणाले, की सरकारने मुलांसाठी बेड आणि कर्मचारी वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
दक्षिण आफ्रिकेतील 80 टक्क्यांहून अधिक नवे रुग्ण गौतेंग प्रांतात समोर येत आहेत. येथील आरोग्य विभागाशी संबंधित डॉ. साकिसी मालुलेके (Dr Ntsakisi Maluleke) यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
मालुलेके म्हणाल्या, यावेळी तरुणांमध्ये तसेच गर्भवती महिलांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. आशा आहे की, येत्या काही आठवड्यांत, या वयोगटात संसर्ग एवढ्या झपाट्याने का पसरत आहे, याचे कारण आम्ही शोधू शकू.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटी ओळख 24 नोव्हेंबरला झाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) याला 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' म्हणून घोषित केले आहे. आतापर्यंत हा प्रकार भारतासह जगातील सुमारे 38 देशांमध्ये पसरला आहे.
या व्हिरिअंटसंदर्भात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच ज्यांनी लसीकरण केलेले नाही अशांनाही याचा धोका सर्वात जास्त आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे दोन रुग्ण कर्नाटकातही आढळले आहे. यानंतर राज्य सरकारने करोना विषयक नवे नियम जारी केली आहेत. महाराष्ट्रातही 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. यांचेही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. (सर्व फोटो - सांकेतिक)