Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:23 AM2020-04-15T10:23:23+5:302020-04-15T14:48:58+5:30

Coronavirus : ATM चा वापर हा प्रामुख्याने पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र जर कोणी एटीएममधून पैसे नाही तर तांदूळ येणार असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक अनोखी गोष्ट समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी एका देशाने लोकांसाठी अनोखी सोय केली आहे.

ATM चा वापर हा प्रामुख्याने पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र जर कोणी एटीएममधून पैसे नाही तर तांदूळ येणार असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे.

व्हिएतनाम असं या देशाचं नाव असून या देशाने लोकांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राईस एटीएम सुरू केले आहे.

राईस एटीएम दिवसभर सुरू राहणार असून यामधून बँकेच्या एटीएमप्रमाणे लोकांना तांदूळ काढता येणार आहेत.

व्हिएतनाममधील एका व्यावसायिकाने पुढाकार घेऊन देशातील लोकांना मदत करण्यासाठी राईस एटीएम मशीन बसविण्याचा निर्णय घेतला.

व्हिएतनाममध्येही कोरोनाचे अनेक रुग्ण असून तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 262 आहे.

31मार्चपासून तिथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन सोबतच तेथील लोक सोशल डिस्टेंसिंगचं देखील पालन करत आहेत.

एका व्यक्तीला साधारण मशीनमधून 2 किलो तांदूळ मोफत मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राईस एटीएममधून तांदूळ घेण्यासाठी हात सॅनिटाझरने स्वच्छ करणं आवश्यक आहे. (सर्व फोटो - ट्विटर)

लॉकडाऊनमधील धान्याची समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.