Coronavirus : कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी सरसावलेले 'हे' खरे हिरो; दिला मदतीचा हात By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:28 PM 2020-03-21T13:28:43+5:30 2020-03-21T13:47:50+5:30
Coronavirus : कोरोना संसर्गापासून लोकांचा बचाव करण्यासाठी अनेक जण सरसावलेले असून त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. अशाच काही खऱ्या हिरोंविषयी जाणून घेऊया. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे तब्बल 11,404 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,76,125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. तसेच आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले आहे.
कोरोना संसर्गापासून लोकांचा बचाव करण्यासाठी अनेक जण सरसावलेले असून त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. अशाच काही खऱ्या हिरोंविषयी जाणून घेऊया.
चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इराणमधील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर.... खरे हिरो
वयोवृध्दांना मोफत मास्क आणि सॅनिटाझर देत आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करणारं कोरोना व्हायरस किट
लोकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर
ही महिला कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्पर आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझर
फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सुपरमार्केट सुरू आहे.
आजोबा आणि नातीचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. आजोबांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आलेले आहे.
नातीने आपल्या इंगेजमेंटची अंगठी अशा पद्धतीने दाखवली. यावेळी दोघेही भावूक झालेले पाहायला मिळाले.
लोकांसाठी हे कुटुंब मोफत टॉयलेट पेपरचं वाटप करत आहे.
चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इटलीतील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज.
लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.