ट्रान्सपरंट PPE किट घालून केला होता कोरोनाबाधितांवर उपचार, आता बनली न्यूज अँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 07:57 PM2020-07-24T19:57:20+5:302020-07-24T20:22:12+5:30

रशियातील एका रुग्णालयात पारदर्शक PPE किट परिधान करून रुग्णांनर उपचार करणारी नर्स नादिया जुकोवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चेचे काराण वेगळे आहे. या नर्सला एका न्यूज चॅनलने अँकर बनवले आहे.

डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, नादियाला मॉस्कोच्या दक्षिणेकडील तुला येथे एका स्थानिक टीव्ही चॅनलने अँकर म्हणून नोकरी दिली आहे. नादिया सध्या येथे एक हवामान खात्याच्या बातम्या देईल. याच बरोबर ती नर्स म्हणूनही आपले काम सुरूच ठेवणार आहे.

सांगण्यात येते, की हवामान खात्याचा अंदाज सांगणाऱ्या अँकरच्या भूमिकेसाठी ती अगदी परफेक्ट आहे. याच बरोबर ती नर्स म्हणून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्नही पूर्ण करू शकेल. कारण तिचे प्रशिक्षणही सुरू आहे.

यापूर्वी नादिया जुकोवाला एका रशियन स्पोर्ट्सविअर ब्रँडकडून मॉडेल म्हणून काम करण्याचीही ऑफर मिळाली होती. मात्र तिने त्यास नकार दिला. कारण तिला केवळ मेडिकल क्षेत्रातच आपले करिअर करायचे होते.

टीव्हीवरील आपल्या नव्या भूमिकेविषयी बोलताना नादियाने म्हटले आहे, 'माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. मी चॅनलचे आभार मानते. या संधीचे मी सोने करीन.

रशियातील एका रुग्णालयात पीपीई किट आड घातलेल्या कपड्यांमुळे नादिया जुकोवावर बरीच टीका झाली होती. एवढेच नाही, तर 23 वर्षीय नादियाला रुग्णालयाच्या ड्रेसकोडचे पालन न केल्यामुळे नोकरीहूनही काढण्यात आले होते. तेव्हा नादिया पहिल्यांदा चर्चेत आली होती.

नादियाचे रुग्णालयातील 'ते' फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. एवढेच नाही, तर नादियाला रशियातील हॉट नर्सदेखील म्हटले जाऊ लागले होते. याशिवाय तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. तसेच संबंधित रुग्णालयालाही टीकेचा सामना करावा लागला होता.

नादियाचे हे फोटो सोशल मिडियावर कसे आले, हे तिलाही समजले नव्हते. तिने सांगितले होते, की जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली, तेव्हा तेथे लोकांनी तिला संबंधित घटनेच्या माध्यमांतून आलेल्या बातम्या आणि फोटो दाखवले. यानंतर तिला यासंदर्भात माहिती मिळाली.

यानंतर नादियाने स्वतःच सांगितले होती, की तिला तिची नौकरी परत मिळाली. कारण नादियाच्या समर्थनार्थ रशियातील अनेक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला होता. यानंतर रुग्णालय प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

का परिधान केला होता हा ड्रेस - नादियाने सांगितले होते, की सातत्याने PPE किट घालून काम करत असल्याने तिला प्रचंड गरमी होती होती. तसेच मर्यादेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने ती ब्रेकदेखील घेत नव्हता. यामुळे तिला PPE कीटच्या आत केवळ इनर विअर घालून काम करणेच योग्य वाटले.

कोरोना वॉर्डमधील रुणांच्या चाचणीसाठी परिधान केलेले पीपीई एवढे पारदर्शक असेल, असे वाटले नव्हते, असेदेखील नादियानं टुला वैद्यकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना सांगितलं होते.

माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, नादियाने एका मुलाखतीत सांगितले, पहिल्यापासूनच लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा होती. यामुळेच तिने नर्स होण्याचे ठरवले होते. नोकरी परत मिळाल्यानंतर नादियाने सांगितले होते, की पून्हा कामावर परतल्याने मला आनंद होत आहे.

नर्स आणि अँकर नादिया जुकोवा.