Coronavirus: ब्रिटीश वैज्ञानिकाचा अविष्कार; ‘ऑनलाइन कॅल्क्युलेटर’ सांगणार कोरोनामुळे मृत्यूची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:40 PM2020-05-15T12:40:12+5:302020-05-15T12:45:33+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगातील सर्व देशांसमोर मोठं आव्हान निर्माण केले आहे. यातून अनेक देश विविध संशोधन करण्यात गुंतले आहेत. कोरोनावरील लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक काम करत आहेत.

आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात ४४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस महामारीमुळे परिस्थिती बिकट होत असताना जगभरात मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त आणि मृत्यू होणाऱ्यांचा डेटा जमा केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या सहाय्याने आता हा डेटा संक्रमित लोकांच्या संरक्षणासाठी वापरला जाईल.

ही महत्त्वाची भूमिका डॉ. अमिताव बॅनर्जी या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात एक ऑनलाइन कॅल्क्युलेटर तयार केले गेले आहे, जो कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही व्यक्तीला मृत्यूच्या जोखीमेचा अंदाज घेऊ शकतो. सध्या हे साधन केवळ यूकेच्या डेटावर तयार केले गेले आहे. हा डेटा असुरक्षित रूग्णांसाठी यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवांना मदत करेल.

http://covid19-phenomics.org/ या लिंकवरुन उघडलेले हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर साधन, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांनी तयार केले आहे. हे प्रोटोटाइप टूल यूकेच्या परिस्थितीनुसार विस्तृत अभ्यासाचा भाग म्हणून तयार केले गेले आहे.

तसेच हे कोरोना व्हायरस लॉकडाऊन लवकर उठवण्यावरुन इशारा देतो, ज्यामुळे एका वर्षाच्या आत ३७ हजार ते ७३ हजार अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. संशोधकांनी अभ्यासासाठी ३८ लाख हेल्थ रिकॉर्डचे आकडे पाहिले. आणि असा निष्कर्ष काढला की, इंग्लंडमध्ये संक्रमणाचे प्रमाण १० टक्के आहे, तर सर्वाधिक धोका असणारे २० टक्के आहे.

त्याच्या मदतीने, वय, लिंग आणि पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या आजारांसारख्या घटकांवर आधारित एका वर्षाच्या दरम्यान कोविड -१९ मुळे होणाऱ्या मृत्यूचा अंदाज घेता येऊ शकतो. हे टूल संक्रमणाचे धोके तसेच आरोग्य सेवांवर पडणाऱ्या ताणतणावाच्या कारणांना ध्यानात घेऊन परिणाम देते.

हे तयार करणाऱ्या टीमचे प्रमुख लेखक डॉ. अमिताव बॅनर्जी यांनी स्पष्ट केले- उदाहरणार्थ, या टूलमध्ये काही माहिती भरल्यानंतर, आम्ही दाखवू शकतो की श्वासोच्छवासाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६६ वर्षांच्या व्यक्तीसाठी, पुढच्या वर्षीपर्यंत ६ टक्के मृत्यू पावण्याचा धोका आहे.

तसेच याच्या मदतीने संपूर्ण देशात समान वयातील २५ हजार पुरुष रूग्णांचा धोका आहे. अशाप्रकारे, हे कॅल्क्युलेटर आपल्याला सांगेल की अशा लक्षणांच्या रूग्णांचा मृत्यू झाला तर वर्षभरात अशा रुग्णांची संख्या किती असू शकेल ते सांगेल.

आमच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की कमकुवत आणि असुरक्षित वृद्ध गटात मृत्यू दरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो मृत्यू होऊ शकतात असं अमिताव बॅनर्जी यांनी सांगितले.

द लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासात असा अंदाज लावला गेला आहे की यूकेमध्ये सुमारे ८४ लाख लोक कोविड -१९ संसर्गास अतिसंवेदनशील आहेत.

या अभ्यासाचे दुसरे लेखक, प्रोफेसर हेम हेमिंग्वे म्हणाले की, संसर्ग दर कमी ठेवल्याने हे संवेदनशील लोक सुरक्षित राहण्यास मदत होते, परंतु मृत्यू टाळण्यासाठी उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे.

Read in English