Coronavirus : कुत्र्यांमधून मनुष्यात शिरला कोरोना व्हायरस; नव्या रिसर्चमधून दावा, पण कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:06 PM2020-04-15T17:06:52+5:302020-04-15T17:13:45+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरस कोविड-19 म्हणजे SARS-CoV-2 आधी सुद्धा दोन कोरोना व्हायरसने मनुष्यांना आपलं शिकार केलं होतं.

कोरोना व्हायरसबाबत सतत नवनवीन थेअरी समोर येत आहेत. अनेकांनी हा स्पष्टपणे हा दावा केला आहे की, कोरोना व्हायरस वटवाघळांमध्ये आढळतो. पण अजून हे स्पष्ट झालेलं नाही की, कोरोना व्हायरस मनुष्यात कोणत्या प्राण्यापासून आला. आता तर एक नवीन रिसर्च समोर आला असून यात कोरोना व्हायरस वटवाघुळातून कुत्र्यात आणि कुत्र्यातून मनुष्यात आल्याचा दावा केलाय. (ALL Image Credit : AFP)

कोरोना व्हायरस कोविड-19 म्हणजे SARS-CoV-2 आधी सुद्धा दोन कोरोना व्हायरसने मनुष्यांना आपलं शिकार केलं होतं. हे दोन व्हायरस होते SARS-Cov आणि MERS-Cov. हे व्हायरसची वटवाघुळातून इतर प्राण्यांमध्ये शिरून मनुष्यापर्यंत पोहोचले होते.

SARS-CoV व्हायरस वटवाघुळातून एका प्राण्यात आणि नंतर मनुष्यात आला होता. तर MERS हा व्हायरस वटावाघुळातून उंटात आणि उंटातून मनुष्यात आला होता.

आता या नव्या रिसर्चमध्ये असे सांगितले जात आहे की, व्हायरस अनेकदा अशा प्राण्यांची निवड करतात जे मनुष्यांच्या अधिक जवळ असतात.

फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेल्या एका प्रारंभिक रिसर्चनुसार, वैज्ञानिकांनी सांगितले की, SARS-CoV-2 म्हणजे कोविड-19 वटवाघुळातून मुंग्या खाणाऱ्या खवल्या मांजरात आला. त्यानंतर खवल्या मांजरातून व्हायरस मनुष्यात आला. पण ही थेअरी काही वैज्ञानिकांना मान्य नव्हती.

कॅनडातील ओटावा युनिव्हर्सिटीमध्ये बायोलॉजीचे प्राध्यापक जुहुआ जिया यांनी कोरोना व्हायरसवर रिसर्च सुरू केला होता. 14 एप्रिलला त्यांचं विश्लेषण मॉलीक्यूलर बायोलॉजी अॅन्ड एव्हॉल्यूशनमध्ये प्रकाशित झालं.

यात प्रा. जुहुआ जिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस वटावाघुळातून निघून कुत्र्यांच्या माध्यमातून मनुष्यांपर्यंत पोहोचला. जिया यांनी त्यांच्या विश्लेषणात सांगितले की, मनुष्यांच्या शरीरात एक प्रोटीन असतं ज्याला जिंक फिंगर अॅंटी-व्हायरल प्रोटीन जॅप म्हणतात.

जॅप जसा कोरोना व्हायरसचे जेनेटिक कोड साइट CpG बघतो, त्यावर हल्ला करतो. इथेच व्हायरस आपलं काम सुरू करतो आणि तो मनुष्याच्या शरीरातील कमजोर कोशिका शोधतो.

जिया यांनी जेनेटिक कोड साइट Cpg, ZAP सहीत अनेक जेनेटिकल मॉलीक्यूल्सचा अभ्यास केला. त्याच आधारावर त्यांनी सांगितले की, कुत्र्यातील जॅप कमजोर असतो. तो कोरोना व्हायरसच्या सीपीजी साइटसोबत लढू शकत नाही. कुत्र्यांच्या आतड्यांमध्ये हा व्हायरस आपलं घर तयार करतो.

कुत्र्यांच्या माध्यमातूनच नंतर व्हायरस मनुष्यात पोहोचतो. जसे की तुम्हाला माहीत आहेच की, चीनमध्ये कुत्र्यासोबतच अनेक प्राणी खाल्ले जातात. पण जिया यांच्या या थेअरीवर अनेक वैज्ञानिक सहमत नाहीत.

सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लिउनी पेनिंग्स यांच्या मते, ही थेअरी आणि जेनेटिक डेटा एकमेकांना सपोर्ट करत नाही. मला हे मान्य नाही.