Coronavirus: जागतिक नेत्यांनी स्वीकारली भारतीय संस्कृती, 'असे' करतात अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:05 PM2020-03-16T15:05:45+5:302020-03-16T15:18:43+5:30

कोरोना व्हायरसचा प्रचंड प्रभाव वाढला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीपायी एकमेकांना हात मिळवण्यासही धजावत नाहीत. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतरही हा व्हायरस पसरत असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे जगभरातील दिग्गजांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा अनेकांशी लांबून हात जोडताना पाहायला मिळत आहे. तसेच जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनीसुद्धा हात जोडण्याच्या संस्कृतीला प्राधान्य दिलं आहे.

ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स हेसुद्धा बऱ्याचदा नमस्ते करताना पाहायला मिळत आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रो हेसुद्धा हातून आलेल्यांना नमस्कार करताना दिसतात.

ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स हेसुद्धा बऱ्याचदा नमस्ते करताना पाहायला मिळत आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रो हेसुद्धा हातून आलेल्यांना नमस्कार करताना दिसतात.

इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीसुद्धा नमस्कार करण्याच्या भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांची भेट घेतली आहे. त्यावेळीसुद्धा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कारानं अभिवादन केलं होतं, अशी माहिती ओव्हल ऑफिसनं दिली आहे.

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी 11 मार्चला लंडनच्या पॅलेडियममध्ये आयोजित प्रिन्स ट्रस्ट अवॉर्डच्या दरम्यान लोकांना अभिवादन केलं आहे. त्यांचा नमस्तेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून मायदेशात परतल्यानंतरही हात जोडून नमस्कार करण्याच्या संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित केलं होतं.

जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी हात मिळवण्याऐवजी लांबूनच हात जोडून नमस्ते करण्याला प्राधान्य दिलं आहे.

जर्मनीचे चान्सलर अँजेला मार्केल यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिया कोस्टा यांची भेट घेतली असून, ते नमस्ते करताना पाहायला मिळाले आहेत.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनीसुद्धा बुधवारी स्पेशनचे किंग फेलिप यांचं नमस्तेनं स्वागत केलं आहे.

इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीसुद्धा देशाला संबोधित करताना एकमेकांना अभिवादन करण्यास सांगितलं आहे.