coronavirus Trumps 200 ventilators for India cost 2.6 million dollar kkg
Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 02:24 PM2020-05-18T14:24:17+5:302020-05-18T14:30:59+5:30Join usJoin usNext कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारताच्या पाठिशी उभा असून व्हेंटिलेटर दान करणार असल्याचं ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. ट्रम्प यांनी मदतीचा हात पुढे केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगचेच ट्विट करुन त्यांचे आभार मानले. कोरोना संकटकाळात आपण एकत्र काम करू. यामुळे भारत-अमेरिकेची मैत्री आणखी घट्ट होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याचं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे अर्थातच यासाठी भारताला पैसे मोजावे लागणार नाहीत, असं अनेकांना वाटलं. ट्विट केल्यानंतर ट्रम्प यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भारत भेटीचा उल्लेख केला. मोदी माझे चांगले मित्र असल्याचंदेखील ते म्हणाले. ट्रम्प यांच्या ट्विटमुळे, त्यांनी मोदींना खूप चांगला मित्र म्हटल्यानं अमेरिका मित्रत्वाच्या भावनेनं भारताला मदत करत असल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र अमेरिका भारताला व्हेंटिलेटर मोफत देणार नसून एका व्हेंटिलेटरसाठी जवळपास दहा लाख रुपये आकारले जाणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे. अमेरिकेकडून मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिका भारताला मोबाईल व्हेंटिलेटर देणार असून एका व्हेंटिलेटरसाठी भारताला १३ हजार अमेरिकन डॉलर (९.६ लाख रुपये) मोजावे लागतील. यामध्ये वाहतूक खर्च धरण्यात आलेला नाही. अमेरिका भारताला २०० व्हेंटिलेटर पाठवणार आहे. त्यासाठी भारताला २.६ मिलियन अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहेत. याशिवाय वाहतूक खर्चदेखील द्यावा लागेल. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या जवळ पोहोचला आहे. तर अमेरिकेतला कोरोना रुग्णांचा आकडा १५ लाखांच्या पुढे गेला आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याडोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीcorona virusDonald TrumpNarendra Modi