CoronaVirus vaccine Marathi News Coronavirus vaccine phase 3 clinical trials in Pakistan
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार! By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:56 PM2020-08-18T22:56:05+5:302020-08-18T23:18:05+5:30Join usJoin usNext पाकिस्तान कोरोना व्हायरस लशीच्या शेवटच्या टप्प्यातील परीक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तानकडून (DRAP) तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी मंजूरी मिळाल्याचे पाकिस्तानच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थने (NIH) म्हटले आहे. पाकिस्तान चिनी कंपनी कॅन्सिनो आणि बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीने तयार केलेल्या लशीचे परीक्षण करणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही लशीचे पाकिस्तानात तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की कॅन्सिनो अनेक देशांत तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करत आहे आणि पाकिस्तानदेखील याचा भाग आहे. कॅन्सिनो, चीन, रशिया, चिली आणि अर्जेंटीनामध्येदेखील आपल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करत आहे. NIH चे एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर मेजर जनरल आमिर इकरम यांना पाकिस्तानात मल्टी सेंटर क्लिनिकल ट्रायलचे मुख्य अन्वेषक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानात नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH), कॅन्सिनो आणि एजेएम फार्मा एकत्रितपणेह हे परीक्षण पूर्ण करतील. पाकिस्तानातील आगा खान मेडिकल युनिव्हर्सिटी कराची, इन्डस हॉस्पिटल कराची, शौकत खानुम मेमोरियल हॉस्पिटल लाहोर आणि शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल इस्लामाबादमध्ये या लशीचे परीक्षण होईल. आलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणानंतर, पाकिस्तानातही या लशीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल. पाकिस्तानात आतापर्यंत तब्बल 2,89,215 जणांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तानइम्रान खानचीनऔषधंcorona virusPakistanImran Khanchinamedicine