दिलासादायक!: "ऑक्टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 14:45 IST2020-06-03T14:21:52+5:302020-06-03T14:45:13+5:30

कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन केव्हा तयार होते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जगातील अनेक देश व्हॅक्सीनचे परीक्षण करत आहेत. अशात कोणत्याही देशातून लवकरच आनंदाची वार्ता येऊ शकते. भारतातील चार व्हॅक्सीनचे सुरुवातीचे परिणामही उत्कृष्ट आले आहेत आणि त्या आता पुढच्या टप्प्यावर आहेत. याशिवाय अमेरिका आणि चीनमधील व्हॅक्सीनचा निकालही उत्कृष्ट आला आहे. तर जाणून घेऊया कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्टशी संबंधित टॉप-10 अपडेट्स.
रशिया आपल्या लष्करावर करणार व्हॅक्सीनची टेस्ट - रशियन सैन्याने म्हटले आहे, की त्यांच्यातील डझनावर व्हॉलंटिअर्सची व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे. तेथे बुधवारपासून लष्कराच्य व्हॅक्सीनच्या परीक्षणाला सुरुवात होईल. लष्कराने म्हटले आहे, की त्यांच्या व्हॅक्सूनचे प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाले आहे. रशियात एकूण 47 व्हॅक्सीन डेव्हलपमेन्टच्या वेग-वेगळ्या स्टेजवर आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाची व्हॅक्सीन गरमीचे दिवस संपेपर्यंत तयार होऊ शकते - ब्रिटेनचे बिझनेस सेक्रटरी आलोक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाने जी व्हॅक्सीन तयार केली आहे, तिचे क्लिनिकल ट्रायल फार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ते म्हणाले, गरमीचे दिवस संपेपर्यंत व्हॅक्सीनचे डोस तयार केले जाऊ शकतात.
भारतातील तब्बल 14 व्हॅक्सीनने जागवली आशा - डिपार्टमेन्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप म्हणाल्या, भारतात जवळपास 30 व्हॅक्सीन आहेत. यातील 14 व्हॅक्सीनच्या सुरुवातीचे निकालांनी आशा जागवली आहे. तर यांपैकी चार व्हॅक्सीन आपल्या डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्यावर आहेत.
Modernaची व्हॅक्सीन ट्रायल दुसऱ्या टप्प्यावर - Moderna Incने म्हटले आहे, की त्यांच्या व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल आता दुसऱ्या टप्प्यावर पोहोचले आहे. आता 600 लोकांवर दोन वेगवेगळ्या डोसची व्हॅक्सीन टेस्ट केली जाईल. मॉडर्नाच्या व्हॅक्सीनचे सुरुवातीचे परिणाम उत्कृष्ट आले होते. याच्या तिसऱ्या टप्प्यात 30 हजार लोकांवर जुलैपासून ट्रायल सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत व्हॅक्सीन तयार करू : US आर्मी - अमेरिकेतील वरिष्ठ संशोधक कर्नल वँडी सॅमन्स-जॅक्सन यांनी पेंटागॉन येथे बोलताना सांगितले, की देशातील काही भागांत 2020 संपेपर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. तेथे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत व्हॅक्सीन तयार होत आहे.
Intravacc, EpiVax आले सोबत - कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी दोन मोठ्या कंपन्या सोबत आल्या आहेत. नेदरलँडची Intravacc आणि अमेरिकेची EpiVax यांनी व्हॅक्सीन तयार करण्यासाठी हात मिळवला आहे. त्यांनी कामही सुरू केले आहे. कंपनीला आशा आहे, की 2020च्या अखेरच्या तिमाहीत त्यांच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात होईल.
ऑक्टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्सीन? - अमेरिकन कंपनी Pfizerने म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन अॉक्टोबरपर्यंत तयार होईल. त्यांच्या संशोधनात जर्मनीची BioNtech कंपनीही मदत करत आहे. मे महिन्यात जर्मनीमध्ये या व्हॅक्सीनचीचे मानवावर पहिले परीक्षण करण्यात आले. आता अमेरिकेत लवकरच परीक्षणाला सुरुवात होऊ शकते.
तुर्की आणि रशिया एकत्रितपणे तयार करतील व्हॅक्सीन - रशिया आणि तुर्की यांच्यात मंगळवारी कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्यासंदर्भात करार झाला. तुर्कीच्या 22 सेन्टर्सवर व्हॅक्सीनवर रिसर्च सुरू आहे.
चीनही तयार करतोय व्हॅक्सीन - चीनी सरकारला आशा आहे, की त्यांची व्हॅक्सीन वर्ष संपेपर्यंत बाजारात येण्यासाठी तयार असेल. तेथील एकाच कंपनीच्या दोन व्हॅक्सीन परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहेत. एवढेच नाही, व्हॅक्सीनचे डोस वेगाने तयार करता यावेत यासाठी चीनने आपली प्रॉडक्शन क्षमताही वाढवली आहे.
कॅनडाने मागवल्या 3.7 कोटी सिरिंज - कॅनडा सरकारला वाटते, की मोठ्या प्रमाणावर वॅक्सीनेशनसाठी सिरिंजची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता लागणार आहे. यासाठी सरकारने 37 मिलियन सिरिंजच्या कॉन्ट्रॅक्टवरही स्वाक्षरी केली आहे. मे महिन्यात कॅनाडा सरकारने एका व्हॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी दिली होती. याचाच अर्थ कॅनाडादेखील व्हॅक्सीन बनवण्याच्या शर्यतीत सामील आहे.