Coronavirus: vaccine trial starts in UK: Oxford University injects first participant pnm
Coronavirus:...म्हणून पुढील ४८ तास महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीची पहिल्यांदाच मानवावर चाचणी By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 11:51 AM2020-04-25T11:51:03+5:302020-04-25T11:55:09+5:30Join usJoin usNext ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाविरुद्धच्या लसीची मानवी चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी याठिकाणी कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत एका मायक्रोबायोलॉजिस्टला कोविड -१९ ची पहिली लस दिली गेली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या या चाचणीसाठी ८०० पैकी एलिसा ग्रैनेटो हिची निवड करण्यात आली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की मायक्रोबायोलॉजिस्ट एलिसाला देण्यात आलेल्या या लसीवर वैज्ञानिकांची आशा टिकून आहे. ही लस शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करेल असा दावा करण्यात येत आहे. स्वतःवर झालेल्या मानवी चाचण्यांनंतर एलिसा म्हणाली, एक वैज्ञानिक म्हणून मला या संशोधनाला पाठिंबा द्यावा वाटतो. आतापर्यंत या विषाणूवर कोणताही अभ्यास न केल्याबद्दल मला वाईट वाटले, परंतु आता मला असं वाटतं की सहयोग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. ज्या दिवशी एलिसावर ही चाचणी सुरू झाली, योगायोगाने तिचा ३२ वा वाढदिवस होता. एलिसा म्हणाली की मला खात्री आहे की ही चाचणी आम्हाला लसीच्या यशस्वी निकालाकडे नेईल एलिसा व्यतिरिक्त कर्करोगावर संशोधन करणारे एडवर्ड ओनील यांनाही ही लस दिली गेली आहे. ओनिलला मेंदुज्वर नावाच्या रोगासाठी लस देण्यात आली आहे. कोविड -१९ प्रमाणे मेनिनजायटीस देखील एक संसर्गजन्य रोग आहे, ज्यात मेंदूत आणि पाठीच्या कणामध्ये जळजळ आणि सूज येते एलिसा आणि ओनीलची लसीकरण झाल्यानंतर आता त्यांच्या आरोग्यावर पुढील ४८ तास लक्ष ठेवले जाईल. लसीचा परिणाम समजल्यानंतर शास्त्रज्ञ दुसर्या टप्प्यात इतर स्वयंसेवकांना लस देतील. दुसर्या टप्प्यासाठी १८ ते ५५ वर्षांच्या निरोगी लोकांची निवड केली गेली आहे. या सर्व लोकांना दोन गटांमध्ये विभागल्यानंतर, त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या लसी वापरल्या जातील. परंतु, त्यांना कोणती लस देण्यात आली आहे ते सांगण्यात येणार नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लस शास्त्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख सारा गिलबर्ट म्हणाल्या मला या चाचणीपासून व्यक्तिशः जास्त अपेक्षा आहेत. हा अहवाल आल्यानंतर लोकांना हे कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी हे औषध किती प्रभावी आहे हे स्पष्ट होईल. यापूर्वी असं वाटलं होतं की, कोविड १९ च्या उपचारात रेमडेसिवीर औषधं प्रभावी सिद्ध होऊ शकते, परंतु चीनमध्ये हे औषध यशस्वी झाले नाही. चीनमधील या अयशस्वी चाचणीचा मसुदा कागदपत्र अचानक जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला होता, त्यानुसार या औषधाने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही किंवा रुग्णाच्या रक्तातील सूक्ष्मजंतूंना कमी केले नाही. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी प्रथम कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील जनुकांमधून स्पाइक प्रोटीन घेतले आणि त्याच्या मदतीने तयार झालेल्या लसीला संबंधित व्यक्तीत परिक्षण करण्यासाठी टोचली. शरीरात अँन्टीबॉडीज तयार केल्यानंतर, ही लस रोगप्रतिकारक शक्तीस उत्तेजन देईल आणि शरीरातील टी पेशी देखील सक्रिय करेल, जी संक्रमित पेशी नष्ट करण्यासाठी कार्य करेल. जरी कोरोना विषाणूने शरीरावर पुन्हा आक्रमण केला तरीही, या अँन्टीबॉडीज आणि टी पेशी लढा देऊन शरीराचे रक्षण करतील. त्यामुळी या चाचणीचा निकाल काय येतो हे पाहणे गरजेचं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus