coronavirus vaccine work on about 150 continues in world these four on top in race
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:22 PM2020-07-28T22:22:37+5:302020-07-28T22:29:53+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. गेल्या 7 महिन्यांत तब्बल 1 कोटी 64 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच काळात तब्बल 6 लाख 50 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जगाची नजर कोरोना लसीवर आहे. (सांकेतिक फटो.) जगभरात जवळपास 150 लसींवर काम सुरू आहे. यांपैकी अधिकांश सुरुवातीच्या टप्प्यावरच आहेत. यातील चार लसी तर अशा आहेत, ज्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत. (सांकेतिक फटो.) यात मॉडर्ना (Moderna), ऑक्सफर्ड (Oxford), फायझर (Pfizer) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ, केव्हापर्यंत तयार होऊ शकते लस? (सांकेतिक फटो.) मॉडर्ना - अमेरिकने तयार केलेली ही लस तिसऱ्या टप्प्यात असून तिची सर्वात मोठी चाचणीही सुरू झाली आहे. या टप्प्यात तब्बल 30 हजार लोकांवर लसीची चाचणी होणार आहे. (सांकेतिक फटो.) मॉडर्ना लसीसंदर्भात अमेरिकेने म्हटले आहे, की ही लस या वर्षाच्या अखेरपर्यंत तयार होऊ शकते. ही लस तयार करणाऱ्या कंपनीला अमेरिकन सरकारकडून एक बिलियन डॉलरची (सात हजार कोटी रुपये) मदत मिळाली आहे. (सांकेतिक फटो.) ऑक्सफर्ड - इंग्लंडची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, एस्ट्राजेनेकाच्या साथीने लस तयार करत आहे. या लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला असून ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीलाही सुरुवात झाली आहे. (सांकेतिक फटो.) भारतातील सीरम कंपनीने ऑक्सफर्डच्या लसीचे प्रोडक्शन करण्यासंदर्भात करारही केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या अखेरीस कंपनी या लसीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीला भारतात सुरुवात करणार आहे. (सांकेतिक फटो.) यात जवळपास 4 ते 5 हजार लोकांवर लसीचे परीक्षण केले जाईल. या लसीची किम्मत एक हजार रुपये प्रति डोस राहील, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर या लसीचा इमरजंसी डोस ऑक्टोबरपर्यंत तयार होऊ शकतो. (सांकेतिक फटो.) फायझर- मॉडर्नाप्रमाणेच फायझरदेखील अमेरिकन लस आहे. ही लसदेखील पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये यशस्वी ठरली असून तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेने संबंधित कंपनीसोबत डिसेंबर महिन्यात 10 कोटी डोससाठी जवळपास दोन अब्ज डॉलरचा (15 हजार कोटी रुपये) सौदा केला आहे. ही लस या वर्षाच्या अखेरपर्यंत तयार होईल, असा दावा या कंपनीने केला आहे. (सांकेतिक फटो.) भारत बायोटेक - कोरोनावरील देशातील पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin). सध्या वेगवेगळ्या राज्यांत कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी सुरू आहे. ही लस भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या (ICMR) सोबतीने तयार केली आहे. ही लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लॉन्च होऊ शकते. (सांकेतिक फटो.) किती असेल किंमत - सध्या संपूर्ण जगाची नजर, लस तयार झाल्यानतंर ती जगभरात वितरित करण्याची प्रक्रिया आणि तिची किंमत किती असेल, यावर आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेनुसार, कोरोना व्हायरसवरील लस तयार करत असलेल्या ग्लोबल व्हॅक्सीन अलायंसचे म्हणणे आहे, की लसीची किंमत जास्तीत जास्त 40 डॉलरपर्यंत (3000 रुपये) असू शकते. (सांकेतिक फटो.)टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसऔषधंडॉक्टरअमेरिकाइंग्लंडभारतcorona virusCoronavirus in MaharashtramedicinedoctorAmericaEnglandIndia