CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 07:35 PM 2020-05-25T19:35:16+5:30 2020-05-25T19:45:26+5:30
CoronaVirus : WHOने आपल्या वेबसाइटवर अँबेसेडर म्हणून पेंग लियुआन यांची ओळख करून दिली आहे. त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पत्नी आहेत, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं कुठेच केलेला नाही. कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव झाला असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचं केंद्रबिंदू चीनमधील वुहान शहर असतानाही जागतिक आरोग्य संघटनेनं वारंवार चीनची पाठराखण केली आहे.
त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. एका रिपोर्टनुसार, WHOने आपल्या वेबसाइटवर अँबेसेडर म्हणून पेंग लियुआन यांची ओळख करून दिली आहे.
त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पत्नी आहेत, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं कुठेच केलेला नाही. WHO ने आपल्या वेबसाइटवर गुडविल अँबेसेडर म्हणून नऊ लोकांची नावं प्रसिद्ध केली आहेत.
जेव्हा पेंग यांचं नाव या पदासाठी घेण्यात आलं, तेव्हा तत्कालीन WHO प्रमुख मार्गरेट चान यांनी सांगितलं होतं की, पेंग जगातला प्रसिद्ध आवाज आहे आणि त्या चांगल्या मनाची स्त्री आहेत.
पहिल्यांदा पेंग यांची निवड २०११मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर WHO प्रमुख झालेल्या टेड्रोस एडहनॉम जिब्रायस यांनी त्यांची फेरनियुक्ती केली.
डेली मेलच्या अहवालानुसार, ब्रिटनचे सांसद आणि परराष्ट्र प्रकरणातील कमिटीचे चेअरमन टॉम टी म्हणाले की, गुडविलची व्याख्या वाढवण्यात आलेली आहे. WHOनं अशा लोकांना निवडलं पाहिजे, जे खरोखरंच लोकांच्या अधिकारासाठी काम करत आहेत.
ज्यांच्या कामावर संशय असेल, अशा लोकांची निवड करता कामा नये. 1987मध्ये पेंग यांचं लग्न शी जिनपिंग यांच्याशी झालं होतं. तेव्हा जिनपिंग चीनच्या झिआमेनमध्ये उपमहापौर होते, पहिल्या पत्नीपासून त्यांनी घटस्फोट घेतला होता.
पेंगसंबंधी WHOनं वेबसाइटवर लिहिलं आहे की, संघटनेचे तत्कालीन डायरेक्टर जनरल (तत्कालीन) मार्गरेट चान यांनी चीनची प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेत्री पेंग लियुआन यांना टीबी आणि एचआयव्ही/एड्ससारख्या रोगांसाठी गुडविल अँबेसेडर नियुक्त केलं आहे.
पेंग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जनरल पॉलिटिकल डिपार्टमेंटची चिनी गीत आणि डान्स समूहाची प्रमुख आहे. सिव्हिल सर्व्हिस आणि मिलिट्रीमध्ये त्यांना मेजर जनरल दर्जा बहाल करण्यात आला आहे
पेंग आरोग्य, टीबी आणि एचआयव्हीसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतात.
2006मध्ये पेंग यांना चीनमध्ये एचआयव्ही/एड्सपासून बचावासाठी मिनिस्टर ऑफ हेल्थ अँबेसेडर बनवण्यात आलं होतं. 2007 मध्ये टीबी कंट्रोल आणि प्रीमॅन्शनच्या नॅशनल अँबेसेडरही त्या झाल्या होत्या.