Coronavirus: लवकरच वुहानमधील लॅबचा भांडाफोड होणार; अमेरिकेने चीनबाबत केला ‘हा’ मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:29 PM2020-07-12T12:29:38+5:302020-07-12T12:33:36+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांनी असा दावा केला आहे की, चीनच्या वुहान लॅबमधील तज्ज्ञ गुप्तचर संस्थेला मिळाले आहेत

एजन्सी त्यांच्या मदतीने बीजिंगविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तयार आहेत की कोरोना विषाणू महामारी वुहानच्या व्हायरलॉजी लॅबमधून बाहेर पडली आणि ती लपवून ठेवणे म्हणजे हत्येप्रमाणे आहे.

बॅननने द मेल यांच्याशी केलेल्या संभाषणात हा खुलासा केला आहे. कोरोना व्हायरसबाबत चीन आणि डब्ल्यूएचओला आधीपासून माहिती होती पण त्यांने हे लपवून ठेवलं असा आरोप करत हॉंगकाँगमधील एक्सपर्टने चीनमधून पळ काढला.

त्याचबरोबर बॅनन यांनी पाश्चात्य देशांना चीनचा 'क्रूर व हुकूमशाही' शासन काढून टाकण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. पळून जाणारे काही चिनी लोक एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) बरोबर जवळ काम करत आहेत आणि वुहानमध्ये काय घडले हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ते सध्या माध्यमांशी बोलत नाहीत पण वुहान आणि इतर प्रयोगशाळेतील लोक पश्चिमेकडे आले आहेत आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरूद्ध पुरावे देत आहेत. ज्यामुळे लोकांना धक्का बसला जाईल. बॅनन यांनी असा दावा केला आहे की, फेब्रुवारीपासून चीन आणि हाँगकाँगहून लोक येत आहेत. अमेरिका कायदेशीर खटला तयार करत आहे ज्याला वेळ लागू शकेल असं बॅनन यांनी सांगितले.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहभागी असलेले बॅनन म्हणाले की सार्स सारख्या विषाणूंकरिता लस आणि औषध तयार करण्याच्या प्रयोगादरम्यान चीनमधून हा विषाणू लॅबमधून बाहेर पडला असल्याचा शोध गुप्तचर यंत्रणा करत आहेत.

तसेच त्यांना अशी भीती वाटली आहे की, प्रयोगशाळेत असे धोकादायक प्रयोग केले गेले आहेत ज्यांना परवानगी नाही. व्हायरस एखाद्याच्या माध्यमातून किंवा चुकून प्रयोगशाळेच्या बाहेर आला आहे.

डिफेक्टर्स अमेरिका, यूरोप आणि ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांशी चर्चा करीत आहेत असा दावा त्यांनी केला आहे. गुप्तहेर यंत्रणांकडे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस आणि लॅबमध्ये जाणारी महत्त्वाची माहिती ज्यात महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध आहेत.

बॅनन यांनी असेही म्हटले आहे की, हा विषाणू वुहानच्या वेट मार्केटमधून अथवा प्रयोगशाळेपासून पसरला आहे. हा प्रसार झाल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एखाद्या हत्येप्रमाणे ती माहिती लपवून ठेवली आहे. तैवानने ३१ डिसेंबर रोजी डब्ल्यूएचओला सांगितले होते की हुबेई प्रांतात अनेक साथीचे रोग पसरले आहेत.

बीजिंगच्या सीडीसीने जानेवारीमध्ये अमेरिकेबरोबर माहिती लपवून व्यापार करार करण्याचा निर्णय घेतला. "जर त्यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सत्य सांगितले असते तर ९५ टक्के लोकांचे जीव आणि आर्थिक नुकसान वाचले असते. या दरम्यान चीनने जगातील संरक्षक उपकरणे जमा केली असा दावा बॅनन यांनी केला.