CoronaVisrus : चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, जगाचं टेन्शन वाढलं; अमेरिका, युरोपनं उचललं मोठं पाऊल By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:55 AM 2022-12-29T10:55:14+5:30 2022-12-29T11:09:29+5:30
कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही चीनने इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवण्याबरोबरच सर्वप्रकारचे निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय मृतांची संख्याही वाढत आहे. परिणामी रुग्णालयातील शवागार आणि स्मशानभूमीतही मृतदेह ठेवायला जागा नाही. अनेक शहरांमध्ये अंत्यसंस्कारासाठीही आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही चीनने इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवण्याबरोबरच सर्वप्रकारचे निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अमेरिका, इटली, जपान आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम तयार करण्यात आले आहेत.
चीनमधील कोरोना स्थिती पाहता, तेथून अमेरिकेत पोहोचणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक असणार आहे. याशिवाय इटलीनेही चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात अमेरिकेने म्हटले आहे की, ज्या लोकांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आहे, असेच लोक चीनमधून विमानाने येऊ शकतील. खरे तर, इटलीच्या निर्णयानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. तसेच, चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाईल, असे इटलीने म्हटले आहे.
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांकडून सांगण्यात आले आहे, की 5 जानेवारीपासून चीन, हॉन्गकॉन्ग आणि मकाऊ येथून अमेरिकेत पोहोचणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागेल. अथवा ते कोरोना संक्रमाणातून बरे झाल्याची खात्री करून द्यावी लागेल. म्हत्वाचे म्हणजे, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट इतर दुसऱ्या कुण्या देशातून अमेरिकेत पोहोचणाऱ्या लोकांसाठीही लागू असेल.
इटलीत दोन फ्लाइट्समधील अर्धे प्रवासी पॉझिटिव्ह - चीनमधून इटलीत पोहोचणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर, इटलीच्या मिलानमध्ये चीनमधून येणाऱ्या दोन फ्लाइट्समध्ये जवळपास अर्धे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पहिल्या फ्लाइटमधील 92 प्रवाशांपैकी 38 टक्के, तर दुसऱ्या फ्लाइटमधील 52 टक्के प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर इटलीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर, इटलीला 2020 सारखी चूक पुन्हा करायची नाही. कारण तेव्हा इटली हा युरोपातील असा पहिला देश होता, जेथे कोरोनाना सर्वाधिक हाहाकार माजवला होता. याशिवाय, भारत आणि जपानसह आशियातील अनेक देशांत चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची टेस्टिंग सुरू केली आहे.