Countries in the world where serving in the military are compulsory
जगातील असे देश, जिथे लष्करात सेवा देणे आहे अनिवार्य By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:35 PM2020-02-04T15:35:09+5:302020-02-04T15:53:40+5:30Join usJoin usNext आज 21 व्या शतकातही देशाच्या सीमांचे आणि देशातील नागरिकांचे संरक्षण ही सर्वच देशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळेच प्रत्येक देश आपल्या पदरी मोठ्या प्रमाणावर सैन्यदल बाळगत असतो. तसेच त्यासाठी आपल्या संरक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो. दरम्यान, जगात असेही काही देश आहेत जिथे लष्करात सेवा देणे अनिवार्य आहे. आज आपण जाणून घेऊयात अशा देशांविषयी इस्राइल लष्करी सेवा अनिवार्य असलेल्या देशांमधील इस्राइल हा प्रमुख देश आहे. इस्राइलमध्ये सर्व पुरुष आणि स्त्रियांना लष्करात सेवा देणे अनिवार्य आहे. नॉर्वे नॉर्वेमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे काटेकोरपणे पालन होते. या देशामध्ये 2013 मध्ये कायदा करून स्त्रीयांना 19 महिने लष्करी सेवा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर कोरिया किम जोंग उनची हुकूमशाही असलेल्या उत्तर कोरियामध्ये सर्व स्त्री आणि पुरुषांना लष्करी सेवा देणे अनिवार्य आहे. तैवान तैवान या देशातही सर्व स्त्री आणि पुरुषांना ठरावीक वयापर्यंत लष्करात सेवा द्यावी लागते. इराण इराणकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नसली तरी इराणचे लष्कर शक्तिशाली मानले जाते. येथेही लष्करी सेवा अनिवार्य आहे.अल्जेरिया अल्जेरियामध्येही सर्व नागरिकांना सहा महिन्यांचे लष्करी शिक्षण अनिवार्य आहे. त्यानंतर 12 महिने नागरी सेवा द्यावी लागते. तुर्की तुर्कीमध्ये 20 ते 41 वर्षांपर्यंतच्या पुरुषांना लष्करी सेवा अनिवार्य आहे. रशिया सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतरही रशियामध्ये लष्करी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. मात्र 2008 नंतर त्यामध्ये काही प्रमाणात सवलत दिली जात आहे. चीन साम्यवादी देश असलेल्या चीनमध्येही लष्करी सेवा अनिवार्य आहे. टॅग्स :आंतरराष्ट्रीयInternational