स्वत:चे लष्कर नसलेले देश

By admin | Published: June 15, 2016 12:00 AM2016-06-15T00:00:00+5:302016-06-15T00:00:00+5:30

फ्रान्स आणि स्पेनजवळ असलेल्या अँडोरा देशाकडे स्वत:चे लष्कर नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल मग युध्दाचा किंवा अन्य धोका उदभवला तर अँडोरा आपले संरक्षण कसे करणार ? अँडोराच्या संरक्षणाची जबाबदारी फ्रान्स आणि स्पेनकडे आहे. या दोन्ही देशांबरोबर अँडोराचे संरक्षणासाठी लष्करी करार झाले आहेत. (लिचटेनस्टेन द मार्शल आइसलँण्ड मायक्रोनेशिया मोनॅको नाऊरु पालाऊ पनामा सेंट लुशिया सामोआ सोलोमॉन आइसलँण्ड तुवालू वानुटू व्हॅटिकन सिटी या देशांचेही लष्कर नाही)

कोस्टा रिका हा मध्य अमेरिकेतील देश आहे. १९४८ साली या देशात गृहयुध्द भडकले होते. गृहयुध्दानंतर कोस्टारिकाने लष्कर बंद केले. लष्कराशिवाय स्वसंरक्षण करणारा हा मोठा देश आहे. या देशाची अंतर्गत सुरक्षा पोलिस संभाळतात. कोस्टारिकाचा शेजारच्या निकारागुआ बरोबर सीमावाद आहे तरीही लष्कराशिवाय या देशाचा कारभार सुरु आहे.

डॉमिनिका या देशामध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर डॉमिनिकाने लष्कर बंद केले. अन्य देशांप्रमाणे पोलिसांकडे या देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. १९८१ पासून या देशाला लष्कर नाही.

ग्रेनेडा हा कॅरेबियन व्दिपसमूहातील एक देश आहे. १९८३ पासून हा देश लष्कराशिवाय आहे. कॅरेबियन व्दिपसमूहातील बहुतांश देशांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेकडे आहे.

कॅरेबियन व्दिपसमूहातील हैतीमध्ये १९९५ पूर्वी अनेकदा लष्करी बंड झाले आहे. बारापेक्षा जास्त वेळा या देशात लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अंतर्गत संघर्षामुळे या देशातील सरकारने लष्कर अखेर बंद केले. १९९५ पासून हैती लष्कराशिवाय आहे.

नाटोचा सदस्य असलेल्या आइसलँण्ड १८६९ पासून लष्कराशिवाय आहे. अमेरिकेबरोबर आइसलँण्डचा लष्करीकरार आहे.

किरीबाती तीन बेटांचा मिळून हा एक देश आहे. गिल्बर्ट आईसलँण्ड म्हणून हा देश ओळखला जातो. जेव्हा गरज असते तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशाला संरक्षण पुरवतात. १९७८ पासून हा देश लष्कराशिवाय आहे.

सुंदर समुद्र किना-यासाठी ओळखला जाणारा मॉरीशेस १९६८ पासून लष्कराशिवाय कारभार करत आहे. मॉरीशेस पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. १० हजार पोलिस पथकावर या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.