Covid 19 delayed Indian exercise Chinese moved into key positions
चीननं 'असा' घेतला कोरोनाचा फायदा; लडाखमध्ये पटकावल्या मोक्याच्या जागा By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 08:52 PM2020-06-03T20:52:25+5:302020-06-03T20:56:04+5:30Join usJoin usNext सध्या लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं आहे. चीन आणि भारतानं लडाखच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. संपूर्ण जगात चीनमधून कोरोना पसरला. त्याच कोरोनाचा गैरफायदा घेऊन चीननं लडाखमध्ये मोठी आगेकूच केली. दर उन्हाळ्यात भारतीय सैन्य लडाखमध्ये सराव करतं. यंदा त्याला कोरोनामुळे उशीर झाला. त्याचा नेमका फायदा चीननं घेतला. मार्चच्या सुरुवातीला भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस लडाखमध्ये सराव करणार होते. मात्र एका जवानाला कोरोनाची लागण झाल्यानं सब सेक्टर नॉर्थमध्ये होणारा सराव पुढे ढकलण्यात आला. दुसऱ्या आठवड्यात लष्कराचा आणखी एक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर सतर्कतेचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास जवानांना मज्जाव करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सैन्याला विविध सूचना देण्यात आल्या. त्यातच सराव पुढे ढकलण्याचीही सूचना होती. चिनी सैन्यानंदेखील त्यांचा सराव पुढे ढकलला होता. मात्र भारतीय सैन्याची परिस्थिती पाहता त्यांनी अचानक आगेकूच सुरू केली. चीननं गलवान खोऱ्यात आणि पँगाँग तलाव परिसरात पुन्हा एकदा सैन्य तैनात केलं. सामरिकदृष्ट्या या भागांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चीननं उचलेली पावलं भारतीय सैन्यासाठी अतिशय अनपेक्षित होती. त्यांनी लगेच हालचाली सुरू केल्या. कोरोनामुळे घालून देण्यात आलेले निर्बंध बाजूला ठेवून सीमावर्ती भागातल्या मोक्याच्या जागांवरील तैनातीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. चीननं आधी सुरुवात केल्यामुळे त्यांना जास्त फायदा मिळाला. सध्या गलवानच्या खोऱ्यात चीनचे तब्बल ३ हजार ४००, तर पँगाँग तलाव परिसरात ३ हजार ६०० सैनिक तैनात आहेत. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina