डे आॅफ द डेड! मेक्सिकोतली अनेक वर्षांपासूनची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 08:23 PM2017-11-01T20:23:36+5:302017-11-01T20:31:27+5:30

मेक्सिकोत गत आठवड्यात भूताखेतांच्या टोळ्या रस्त्यावर उतरल्या होत्या. निमित्त होते ‘डे ऑफ द डेड’च्या तयारीचे.

मेक्सिकोत हे चित्र दरवर्षी दिसते. भुताचे मुखवटे लावून लोक रस्त्यावर एकत्र फेरी काढतात.

हा फेस्टिव्हल येथील लोकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. यावर्षी २ नोव्हेंबर रोजी ‘डे ऑफ द डेड’साजरा करण्यात येणार आहे.

या फेस्टिव्हलचा इतिहास खूप जुना आहे. असे सांगतात की, २००० वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.

पूर्वी लोक आपल्या पूर्वजांच्या थडग्यांना फुले वाहून हा दिवस साजरा करीत होते. काळानुसार यात बदल झाला आणि आता लोक उत्सवाच्या स्वरूपात हा दिवस साजरा करतात.