Did YOU use Facebook between May 2007 and December 2022? META company likely owes you money
२००७ ते २०२२ काळात तुम्ही बनवलंय Facebook अकाऊंट?; कंपनी देणार पैसे, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 04:37 PM2023-04-18T16:37:46+5:302023-04-18T16:42:02+5:30Join usJoin usNext तुम्ही Facebook वापरत असाल आणि तुमचे Facebook खाते २००७ ते डिसेंबर २०२२ दरम्यान तयार केले असेल, तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. होय, फेसबुक तुम्हाला पैसे देईल. खरं तर, २०१८ मध्ये फेसबुकवर आपल्या ८.७ कोटी युझर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने केंब्रिज अॅनालिटिकाला दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मेटाने आता या खटल्यात पैसे देण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच, तुम्ही ७२५ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ५९४७ कोटी रुपयांच्या सेटलमेंटच्या भागासाठी पात्र असाल. २०१८ मध्ये फेसबुकवर डेटा चोरीचा हा आरोप लावण्यात आला होता. आणि २०१९ मध्ये खटला दाखल केला आहे. या खटल्यात दावा करण्यात आला होता की फेसबुक केवळ लिंग आणि वय यासारख्या मूलभूत डेटाचीच नाही तर युझर्सचे फोटो, त्यांनी बनवलेले व्हिडिओ, त्यांनी पाहिलेले व्हिडिओ आणि त्यांचे वैयक्तिक संदेश देखील शेअर करत आहे. फेसबुकला २०१५ पासून केंब्रिज अॅनालिटिकाच्या अयोग्य डेटा संकलनाविषयी माहिती होती आणि ही कार्यवाही थांबवण्यासाठी किंवा वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी ते अयशस्वी झाले असं कायदा कार्यालयाने त्यांच्या वेबसाइटवर शेअर केले. फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा आणि सामग्रीचा गैरवापर योग्यरित्या संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा दावा खटल्यात करण्यात आला आहे. आता फेसबुककडून है पैसे कसे मिळवायचे किंवा पैसे मिळवण्यासाठी कसा दावा करू शकता? हे जाणून घ्या. फेसबुक युजर्स ज्यांचे खाते २४ मे २००७ ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान उघडले आहे ते पैशासाठी दावा करू शकतात. या व्यक्तींना २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत दावा सादर करावा लागेल. एक समझोता झाला असून ऑगस्ट २०२२ मध्ये न्यायालयात आणले गेले. त्यानंतर २२ डिसेंबरपर्यंत अनेक महिने वाटाघाटी झाल्या, जेव्हा वादींनी समझोत्याच्या प्राथमिक मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला. डेरेक लोसेर आणि केलर रोहरबॅच एलएलपीचे लेस्ली वीव्हर, वादींचे प्रतिनिधीत्व करणारे कायदे वकील यांनी एका निवेदनात दिले आहे. या निवेदनात म्हटलंय की, गुंतागुंतीच्या आणि प्रमुख गोपनीयतेच्या प्रकरणातील महत्त्वाच्या सेटलमेंटमुळे युझर्सला दिलासा मिळाला आहे. कराराची रक्कम ७२५ मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ५९४७ कोटी रुपये आहे. म्हणजेच, या रकमेच्या काही भागासाठी तुम्ही पात्र असाल. ज्या युजर्संना वाटते की ते सेटलमेंटच्या करारासाठी पात्र आहेत. ते त्यांचे नाव, पत्ता आणि ईमेलसह एक फॉर्म भरू शकतात. तुम्हाला तुमचे Facebook युजर नाव आणि तुमच्या खात्याशी संबंधित फोन नंबर देण्यास सांगितले जाईल. क्लेम करण्यासाठी इथं क्लिक करा - https://www.facebookuserprivacysettlement.com/#submit-claimटॅग्स :फेसबुकFacebook