जपानमधल्या टोकियोमध्ये डिजिटल कलादालनात उत्कृष्ट चित्रांचं प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 23:19 IST2018-05-03T23:19:09+5:302018-05-03T23:19:09+5:30

कोसळणा-या धबधब्यात फुलांनी सजलेल्या शालवर मुक्त फिरणा-या मुलीचं चित्र अनेकांना आकर्षून घेतंय.
डिजिटल माध्यमाच्या सहाय्यानं ही सर्व चित्रं चितारण्यात आली आहेत.
भिंतीवर लटकवलेल्या कंदिलांनी खोली झळाळून निघाल्याचंही चित्रात पाहायला मिळतंय. जपानी लोकांना कंदिलांनी घर सजवायला फार आवडते.
सूर्यफुलासारख्या दिसणा-या कलाकृतीतून एक मुलगी फिरत असल्याचंही कॉम्प्युटर्स आणि प्रोजेक्टरच्या मदतीनं दाखवण्यात आलंय.
या प्रदर्शनासाठी जवळपास 520 कॉम्प्युटर्स आणि 470 पोजेक्टर्सचा वापर करण्यात आला आहे.