Donald Trump jr girlfriend Kimberly Guilfoyle tests Corona positive know about thisperson.
Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:40 PM2020-07-04T15:40:45+5:302020-07-04T16:05:40+5:30Join usJoin usNext राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा, डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या प्रेयसीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. किम्बरली गुइलफॉय, असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. यासंदर्भात एका अमेरिकन माध्यमाने शुक्रवारी माहिती दिली. किम्बरली गुइलफॉय डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांना डेट करतात. त्या पूर्वी फॉक्स न्यूज टेलिव्हिजनसाठी काम करायच्या. गुइलफॉय यांनी माउंट रशमोर येथील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या भाषणाचा आणि सेलिब्रेशनच्या आतिशबाजीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण डकोटाचा प्रवास केला होता. गुइलफॉय ट्रम्प कॅम्पेनमधील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 51 वर्षीय गुइलफॉय, थेट राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यांना ताबडतोब आयसोलेट करण्यात आले. विषेश म्हणजे गुइलफॉय या पॉजिटिव्ह असल्याची पुष्टी एका रूटीन टेस्टमधून झाली आहे. वृत्तपत्राला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, ट्रम्प कॅम्पेनच्या वित्तीय समितीतील कर्मचाऱ्यांचे प्रमुख सर्जियो गोर यांनी सांगितले, 'गुइलफॉय या व्यवस्थित आहेत आणि पुन्हा एकदा त्यांची टेस्ट करण्यात येईल. कारण त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. मात्र, त्या जोवर आयसोलेट आहेत, तोवर कामापासूनही दूरच राहतील. गोर म्हणाले, खबरदारी म्हणून गुइलफॉय त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करतील. तसेच, गर्लफ्रेंड पॉझिटिव्ह आल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांचीही टेस्ट करण्यात आली. यात ते निगेटिव्ह आले आहेत. टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी, खबरदारी म्हणून डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर, हेदेखील सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच ते सर्व सार्व जनिक कार्यक्रम रद्द करत आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुइलफॉय या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नजिकच्या, अशा तिसऱ्या व्यक्ती आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुइलफॉय यांच्या व्यतिरिक्त, ट्रम्प यांचा खासगी सेवक आणि अमेरिकन उपराष्ट्रपतींचे प्रेस सचिव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने शुक्रवारी किमान 51,842 नवे रुग्ण समोर आल्याचे सांगितले आहे. याच बोरबोर आता अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27,93,425वर पोहोचली आहे. तर 1,29,432 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर, डोनाल्ड ट्रम्प आणि किम्बरली गुइलफॉय डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरसह किम्बरली गुइलफॉय Read in Englishटॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाकोरोना वायरस बातम्याDonald TrumpAmericaUSUnited Statescorona virus