ट्रम्प स्वत:च्या खिशातून देणार सुनीता विलियम्स यांना ओव्हरटाइम सॅलरी; किती आहे वेतन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 22:19 IST2025-03-22T21:40:13+5:302025-03-22T22:19:13+5:30

अंतराळवीर सुनीता विलियम्स तब्बल ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतली आहे. सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांचं यान अंतराळात गेल्यानंतर बिघडले होते. त्यामुळे या दोघांच्या पुन्हा परतीच्या प्रवासावर चिंता व्यक्त करण्यात आली. ९ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर अखेर हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप आले आहेत.

शनिवारी नासाचे अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हरटाइम सॅलरी देण्याचं आश्वासन दिले. हे दोघेही अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी NASA च्या जाँईट क्रू फ्लाइट टेस्ट मिशनसाठी गेले होते. हे मिशन फक्त ८ दिवसांचे होते.

सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या स्पेसक्राफ्ट थ्रस्टर्समध्ये तांत्रिक अडचण आली. त्यामुळे ९ महिने या दोघांना अंतराळ स्थानकातच राहावे लागले. त्यानंतर एलन मस्क यांच्या मदतीने १९ मार्च रोजी १७ तासांच्या प्रवासानंतर या दोघांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यात आले.

या दोघांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. नासाच्या या दोन्ही अंतराळवीरांना ओव्हरटाइमसाठी एक्स्ट्रा सॅलरी देणार का असं डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले. तेव्हा कुणीही माझ्याशी यावर बोलले नाही. जर मला द्यायचे असेल तर मी माझ्या खिशातून त्यांना पैसे देईन. त्यांनी जे काही सहन केले त्यापुढे काहीच मोठे नाही असं ट्रम्प म्हणाले.

नासाच्या अंतराळवीरांना सरकारी कर्मचारी मानले जाते. त्यांना दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसारखा पगार मिळतो. दीर्घ काळाच्या मिशनसाठी एक्स्ट्रा सॅलरी दिली जात नाही. ज्यात ओव्हरटाइम, वीकेंड अथवा सुट्टीत काम करणे याचा समावेश आहे. नासा एस्ट्रोनॉट्सच्या येण्या जाण्याचा, तिथे राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करते.

त्याशिवाय डेली खर्चासाठी वेगळे ५ डॉलर(४३० रूपये) दिले जातात. सुनीता विलियम्स, बूच विल्मोर यांची सॅलरी क्रमश: ९४,९९८ डॉलर(८१.६९ लाख) आणि १,२३,१५२ डॉलर(१.०५ कोटी) आहे. त्याव्यतिरिक्त अंतराळात राहिलेल्या एकूण २८६ दिवसांसाठी त्यांना १४३० डॉलर म्हणजे १ लाख २२ हजार ९८० रूपये मिळतील.

नासाच्या अंतराळांना सुरक्षित आणल्याबद्दल ट्रम्प यांनी एलन मस्क यांचे आभार मानलेत. जर आमच्याकडे मस्क नसते तर या अंतराळवीरांना आणखी खूप काळ तिथे अडकावे लागले असते. एलन मस्क सध्या अडचणीच्या काळातून जात आहेत. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्के घट झाल्याने त्यांना ४ लाख कोटी नुकसान सहन करावे लागले आहे.

जेव्हा जगभरातील लोक सुनीता विलियम्स अंतराळातून पुन्हा येणार की नाही अशा चिंतेत होते, तेव्हा ५९ वर्षीय भारतीय अंतराळवीर सुनीता मात्र अंतराळात विविध प्रयोग करून बघत होत्या. स्वत:ला विविध कामांमध्ये व्यस्त ठेवत असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या.

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात भाज्यांचे पीक घेण्याचा प्रयोग केला. अंतराळातही लागवड करता येते. लेट्यूस या वनस्पतीचे निरिक्षण केले. त्यांनी हा प्रयोग अंतराळात असताना वीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून केला होता.

या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळात १५० प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून पाहीले आहेत. सुनीता विलियम्स अंतराळात स्वत:चे स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून व्यायामही करत होत्या. त्यांनी ६२ तास आणि ९ मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे. एवढा वेळ स्पेसवॉक करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अंतराळवीर आहेत असं नासाने म्हटलं.