चीनमधील वाळवण संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 16:25 IST2018-09-14T16:22:22+5:302018-09-14T16:25:31+5:30

कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ आपण घराच्या अंगणात किंवा छतावर वाळवण्यासाठी घालतेले पाहिलेच असेल.
मात्र, चीनमध्ये एक गाव आहे. त्या ठिकाणी प्राचीन काळापासून घरांच्या छतावर मिरच्या वाळवतात. येथील अनेक वर्षांपासूनची ही एक परंपरा आहे.
चीनच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वुआयनच्या हुआंगलिंग गावात अशा प्रकारचे वाळवण पाहायला मिळते. मिरच्यांसह कडधान्य या परिसरात वाळविली जातात. यासाठी घरांच्या छतावर खास सोय केलेली दिसून येते.
विशेष म्हणजे, हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.