Dust storm in Australia, lightning disappears in many cities
ऑस्ट्रेलियामध्ये आगीनंतर आता धुळीचं वादळ, अनेक शहरांमध्ये वीज गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 04:14 PM2020-01-21T16:14:03+5:302020-01-21T16:22:24+5:30Join usJoin usNext ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती, आगीचं संकट टळत नाही तोच तिकडे धुळीचं वादळ आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये धुळाच्या वादळानं लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. धुळीच्या वादळाचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला असून, तो फारच भयंकर आहे. धुळीच्या वादळाची तीव्रता जास्त असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. धुळीचं वादळ 94 किमी प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकत आहे. या वादळामुळे इमारती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा प्रकारचं वादळ जास्तीत जास्त मध्य आशियामध्ये येत असतात. अशा प्रकारचं वादळ जास्तीकरून मध्य आशियामध्ये येतं. या वादळाची तीव्रता मोठी असल्यानं प्रशासनानंही सतर्कता बाळगली आहे. तिथले फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत.