Earth Hour event non essential electric lights will be turned off
#EarthHour आज तासभरासाठी बत्ती गुल होणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 07:01 PM2018-03-24T19:01:59+5:302018-03-24T19:01:59+5:30Join usJoin usNext ‘अर्थ अवर’ राबवणाऱ्या वर्ल्ड वाइड फंडाचे मुख्यालय सिंगापुरात आहे. २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका तासासाठी दिवे मालवले गेले तेव्हापासून या मोहिमेची सुरुवात झाली. दरवर्षी ठरलेल्या दिवशी संध्याकाळी साडे आठ ते रात्री साडे नऊपर्यंत दिवे मालवून अर्थ अवर साजरा केला जातो. यावर्षी जगभरातील किमान १७८ देश बत्तीबंद करून या मोहिमेत सहभाग घेतील, अशी शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही अर्थ अवरसाठी अंधार केला जाऊ लागला आहे. मरिन ड्राइव्हवरील इमारतींचे दिवे तसेच गेट वे ऑफ इंडियावरील दिवे बंद केले जाऊ लागले. आता रेल्वेनेही या मोहिमेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी जगभरातील दिवे रात्री साडेआठला मालवले जातील त्याचवेळी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीतील, बाहेरील बत्ती गूल केली जाईल. अर्थात हे दिवे विझवताना अत्यावश्यक कामांसाठी असलेले दिवे मात्र चालूच ठेवले जातील. अर्थ अवरची सुरुवात वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने केली. जगात पहिल्यांदा २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात अर्थ अवर साजरा झाला. नागरिकांना आवाहन करून तासभरासाठी दिवे बंद केले गेले. हळूहळू जागरणाची ही लाट जगभर पसरली. टॅग्स :पृथ्वीवातावरणEarthenvironment