काही क्षणात विकल्या गेल्या Elon Musk च्या गर्लफ्रेन्डच्या डिजिटल कलाकृती, वाचा किती मिळाली किंमत? By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:36 PM 2021-03-03T13:36:37+5:30 2021-03-03T13:57:43+5:30
Elon Musk girlfriend Grimes digital artwork : एका डिजिटल आर्टवर्कमध्ये एक बाळ बसला होता. तो मंगळ ग्रहाची रखवाली करताना दिसत आहे. ही आकृती विशेष लक्ष वेधून घेत होती. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Mask) ची गर्लफ्रेन्ड आणि गायिका ग्रिम्सने आपल्या डिजिटल आर्ट कलेक्शनचा नुकताच लिलाव केला. ऑनलाइन लिलावात पूर्ण कलेक्शन २० मिनिटांच्या आत ५.८ मिलियन डॉलर्स म्हणजे ४२.४० कोटी रूपयांना विकलं गेलं. ग्रिम्सने या कलेक्शनला वॉरनिम्फ( Warnymph) असं नाव दिलं आहे. यात तिने दाखवलं की, कशाप्रकारे एक एंजल बाळ मंगळ ग्रहाची रक्षा करत आहे.
ग्रिम्स(Grimes) चे सर्वच आर्टवर्क नॉन फंजिबल टोकंसच्या रूपात विकण्यात आले आहेत. हे त्या प्रक्रियेत विकले जातात ज्यात बिटकॉइनसारखे दुसरे एसेट विकले जातात. ग्रिम्सने ब्लॉकवर १० कलाकृती २० मिनिटात ४२.४० कोटी रूपयांचा विकल्या.
एका डिजिटल आर्टवर्कमध्ये एक बाळ बसला होता. तो मंगळ ग्रहाची रखवाली करताना दिसत आहे. ही आकृती विशेष लक्ष वेधून घेत होती. या कलाकृतीला केवळ १० मिनिटात ३००,०० डॉलर्स म्हणजे २.१९ कोटी रूपयात विकली गेली. तर न्यू बॉर्न २ NFT ला २.५ मिलियन डॉलर म्हणजे १८.२८ कोटी रूपयांना रीलिस्ट करण्यात आलं.
ऑनलाइन झालेल्या या लिलावात डिजिटलल आर्टवर्क पाहून लोकांनी अंदाज लावला की, या कलाकृतीमध्ये दाखवलेलं बाळ एलन मस्क आणि ग्रिम्स यांचं आहे. यानंतर ग्रिम्स म्हणाली की, नियो-जेनिसिसची देवी आहे.
ग्रिम्सने निफ्टी गेटवे प्लॅटफॉर्मवर NFT च्या माध्यमातून आर्टचे तुकडे विकले. या पूर्ण कलेक्शनसाठी ग्रिम्सने तिचा भाऊ मॅकसोबत काम केलं होतं.
इतर कलाकृतींमध्ये स्पेसमध्ये एक मुलाची पंख लावलेली कलाकृती लक्ष वेधणारी होती. काही ग्रिम्सने तिच्या नव्या म्युझिकसाठी लावले होते.