पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 02:43 PM 2024-07-22T14:43:55+5:30 2024-07-22T14:54:38+5:30
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये मस्क यांच्यासह यामध्ये पंतप्रधान मोदी, व्लादिमीर पुतिन, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांसारख्या मोठ्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
एल़ॉन मस्कने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण रॅम्पवर चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार केलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक डिझाइनचा पोशाख परिधान केला असून पांढरे शूज घालून रॅम्पवर चालताना दिसत आहे.
एलॉन मस्कने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना व्हीलचेअरवर बसवलेले दाखवले आहे.
याशिवाय व्लादिमीर पुतिन एका लक्झरी ब्रँड LV चा लोगो असलेला ड्रेस घातलेला दिसून येत आहेत.
याशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग टेडी बेअर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनही वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा लांब काळा कोर्ट आणि काळ्या चष्म्यांमध्ये दिसत आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत असलेले डोनाल्ड ट्रम्प