Emergency declared in Sri Lanka due to violence in the Buddhist-Muslim community
बौद्ध-मुस्लिम समाजातील हिंसाचारामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 11:55 PM2018-03-06T23:55:22+5:302018-03-06T23:55:22+5:30Join usJoin usNext जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली सुरू असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर केली. मागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरूप घेतले आहे. श्रीलंकेत जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर सुरू असल्याचा आरोप काही बौद्ध संघटना करत होत्या. प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूसही करण्यात आली होती. त्याच खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ही ठिणगी पडली.टॅग्स :श्रीलंकाSri Lanka