खोटे कोरोना रुग्ण बनून महिला डॉक्टरला पाठवले अश्लिल मेसेज; स्क्रिनशॉट व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:19 PM 2020-07-16T13:19:24+5:30 2020-07-16T13:39:38+5:30
कोरोनाच्या माहामारीत संपूर्ण जगभरातील डॉक्टरर्स दिवसरात्र मेहनत करून कोरोना रुग्णांचे उपचार करत आहेत. सर्वच स्तरातून कोरोनायोद्ध्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. तसंच त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरर्स रुग्णांची सेवा करत आहेत. पण पाकिस्तानमध्ये मात्र कोरोनायोद्ध्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणच्या डॉक्टर महिला रुग्णांच्या वर्तनामुळे हैराण झाल्या आहेत. या ठिकाणचे पुरूष महिला डॉक्टरशी बोलण्यासाठी कोविड 19 झाल्याचे नाटक करत आहेत.
या ठिकाणचे पुरूष महिला डॉक्टरशी बोलण्यासाठी कोविड 19 झाल्याचे नाटक करत आहेत
पाकिस्तानी महिला डॉक्टरांना अश्लिल मेसेजेसनी ट्रोल केले जात आहे. होणारी गर्दी टाळण्यासाठी पाकिस्तानमधील डॉक्टरांनी ऑनलाईन मसेजेसची सुविधा ठेवली आहे. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून मेडिकल सुविधा उपलब्ध करून देत असलेल्या डॉक्टरांच्या बाबतीत असे होत आहे.
बिया अली जॅब नावाच्या डॉक्टरने ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असं सांगितले की, कठीण काळात मी माझ्या देशाची मदत करण्यासाठी पुढे आली आहे. मला असं वाटलं की पाकिस्तानी समजदार असतील पण त्यांना या कठीण काळात सुद्धा मैत्री आणि शारीरिक संबंधांमध्ये रस आहे.
यानंतर त्यांनी आपले ट्वीटर अकाऊंट डिलीट केले आहे. पाकिस्तानातील महिला डॉक्टरांसोबत या आधीही असे प्रकार झाले आहेत. डॉक्टर अंजा यांनी सांगितले की, सुरूवातीला हे लोक डॉक्टरसाहेब म्हणून बोलायला सुरूवात करतात. त्यानंतर जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी या भामट्यांनी स्वतःला मेडिकल स्टूडंट असल्याचेही सांगितले आहे.
या डॉक्टरांनी अश्लिल मेसेजेसचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत.
ऑनलाइन टेलीमेडिसिन कंपनीच्या फाउंडर एलीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला माहामारीच्या काळात लोकांच्या समस्या दूर करायच्या आहेत. पण आपल्या टीममधील डॉक्टर्सना मात्र छळाचा सामना करावा लागत आहे.