कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:30 PM2023-06-26T12:30:18+5:302023-06-26T12:35:27+5:30

आतापर्यंत अण्वस्त्रांच स्पर्धा होती हे ठीक परंतू, पाकिस्तानने चीनच्या मदतीने अणुबॉम्ब डागणारी तोफच भारताच्या दिशेने रोखली आहे.

चिनी ड्रॅगन आणि पाकिस्तानने भारताविरोधात खतरनाक पाऊल उचलले आहे. आतापर्यंत अण्वस्त्रांच स्पर्धा होती हे ठीक परंतू, पाकिस्तानने चीनच्या मदतीने अणुबॉम्ब डागणारी तोफच भारताच्या दिशेने रोखली आहे. चीन पाकिस्तानला घातक ड्रोन, कम्युनिकेशन टॉवर आणि जमिनीखाली केबलचे जाळे उभारण्यास मदत करत आहे. यापुढे जाऊन चीनने पाकिस्तानला अणु बॉम्ब डागू शकणारी तोफ दिली आहे.

कित्येकवेळा हरला तरी युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानने क्षणाचाही विलंब न लावता ती एलओसीवर तैनात केली आहे. या तोफेचे नाव एसएप १५ आहे. चीनची कुख्या शस्त्र निर्मिती करणारी कंपनी नोरिंकोने ही तोफ बनविली आहे. यापूर्वीच चीनने या तोफेला भारतीय सीमेवर तैनात केले आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर जागोजागी या तोफा दिसू लागल्याचे भारतीय सैन्य अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तान डेवेळी ही तोफ दाखविण्यात आली होती. ही १५५ मिलीमीटर तोफ एका ट्रकवर असते.

तोफ डागल्यावर तिथून पळून जाण्याचे काम करते. यामुळे या तोफेचे लोकेशन प्रतिहल्ला करण्यासाठी मिळत नाही. पाकिस्तानने चीनकडून अशा 236 तोफा मागविल्या आहेत. याच्या दोन बॅच मिळाल्या आहेत.

SH-15 हा चीनी तोफ PCL-181 चा निर्यात प्रकार आहे. 23 मार्च रोजी इस्लामाबादमध्ये आयोजित केलेल्या परेडमध्ये पाकिस्तानने ही चिनी तोफ दाखवली होती. या तोफेचे वजन 22 टन असून ती रस्त्यावर ताशी 90 किमी वेगाने नेली जाऊ शकते.

यात डिजिटल फायर कंट्रोल सिस्टीम बसवण्यात आली आहे. निम-स्वयंचलित लोडर प्रणाली असल्यामुळे तोफेच्या आत शेल लोड करण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो. ही तोफ उंच डोंगरांमध्ये देखील तैनात करता येते.

SH-15 ही तोफ एका मिनिटात 4 ते 6 शेल डागू शकते. या घातक तोफेची मारक क्षमता 53 किमी आहे.

भारताच्या K9 वज्र तोफेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने ही तोफ घेतली आहे. भारताची K9 वज्र तोफ दक्षिण कोरियाने बनवली आहे. भारताने ही K9 वज्र तोफ पाकिस्तानच्या सीमेपासून चीनच्या सीमेपर्यंत शेकडोच्या संख्येने तैनात केली आहे. या भीतीने पाकिस्तानने आता SH-15 तोफ खरेदी केली आहे.

पाकिस्तान भारताच्या सीमेवर छोटे अणुबॉम्ब डागू शकतो. पाकिस्तानला यासाठी छोटे अणुबॉम्ब बनवावे लागतील असे युद्ध तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानने हे छोटे अणुबॉम्ब बनविण्याची तयारी केल्याचे २०११ मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी सांगितले होते.