Photos: चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 09:15 AM 2023-01-01T09:15:04+5:30 2023-01-01T09:29:29+5:30
बिजींग ते शांघाई आणि शांघाई ते वुहानपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोकं एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करत होते, सर्वांना शुभेच्छा देत होते. यावेळी, मोठी आतषबाजीही पाहायला मिळाली. कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. चीनमध्ये संसर्गामुळे दररोज ९,००० मृत्यू होत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे, असे लंडन येथील ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी ‘एअरफिनिटी’ने सांगितले.
दरम्यान, अमेरिका, तैवान, जपान, भारत, इटली, दक्षिण कोरिया, पाकिस्तान आणि मलेशियाने कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असणाऱ्या व लसीकरण झालेल्या चिनी प्रवाशांनाच देशात प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
कोरोनामुळे गेल्या ३ वर्षांपासून चीनसह जगभरातील देश त्रस्त झाले आहे. आता, २०२३ चं नवीन वर्ष उजाडलं असतानाही चीनमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, चीनी लोकांनीही नववर्षांचे स्वागत जल्लोषात केल्यामुळे इतर देशातील लोकांना काहीसा दिलासा वाटत आहे.
बिजींग ते शांघाई आणि शांघाई ते वुहानपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोकं एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करत होते, सर्वांना शुभेच्छा देत होते. यावेळी, मोठी आतषबाजीही पाहायला मिळाली.
वुहान... जेथे कोरोना व्हायरस प्रथमच संक्रमित झाल्याचे निदर्शनास आले, मोठ्या सुरक्षा बंदोबस्तात येथे लोक जल्लोष साजरा करताना दिसून आले. येथे शकडो लोक नवीन वर्षाच्या स्वागताला दिसून आले.
चीनच्या गुंझाओ शहरातही मोठी गर्दी जमली होती. येथील नैनिंगमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचे विशेष सेलिब्रेशन करण्यात आले होते. येथे हजारोंची गर्दी पाहायला मिळाली.
चीनच्या सेंट्रल हुबेई प्रांतात हजारो चीनी नागरिक एकत्र जमले होते, त्यांच्या हाती फुगे पाहायला मिळाले, येथे अंदाजे १० हजार पेक्षा अधिक नागरिक नववर्षाच्या स्वागताला उपस्थित होते.
एरियल व्हूवमध्ये दिसून येते की, कशाप्रकारे लोक पिडस्ट्रियन क्रॉसिंगवर एकत्र आले, ज्यामुळे ट्रॅफिक जामची स्थिती दिसून आली.
चीनच्या हेनान प्रांतात पार्कमध्ये लोकांनी खूप आतषबाजी केली, आकाशात ड्रोनच्या सहाय्याने २०२३ असे लिहिण्यात आले होते. तर, हाँगकाँगमध्येही कोरोना प्रतिंबधन हटविण्यात आले होते. येथेही हजारोंच्या संख्येनं लोकं एकत्र आले होते.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये न्यूज कोविड नितीला जिनपिंग प्रशासनाने वापस घेतले, त्यानंतर देशात बॅरिकेट्स हटविण्यात आले होते. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बॅरिकेड्स लावण्यात आले, जेथे लोकं एकत्र जमले होते.