Every person in this village is Kung Fu Master
या गावातील प्रत्येक व्यक्ती आहे कुंग फू मास्टर By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:55 PM2018-11-27T20:55:05+5:302018-11-27T20:58:01+5:30Join usJoin usNext कोणत्याची संकट काळात आत्मसंरक्षण करण्याची गरज असते. कुंग फू या प्राचीन कलेच्या माध्यमातून एकमेकांचं संरक्षणही करता येतं. मध्य चीनच्या तियानझु प्रांतातील गॅक्सीडाँग या गावाची प्रसिद्धी मार्शल आर्टसाठी जगभरात आहे. या गावाने कुंग फूची परंपरा आजही जपून ठेवली आहे. शेतकरी असोत अथवा व्यावसायिक, उद्योजक असोत सर्व लोक येथे नियमाने कुंग फूचा सराव करताना दिसतात. 150 वर्षांपूर्वी येथे तन्ग्लाओशून नावाचा एक भिक्षू आला होता. त्याने राजाच्या सेनेपासून बचाव होण्यासाठी येथील शाओलीन मंदिरात आश्रय घेतला होता. सुरुवातीला गावातील लोकांनी त्याला त्रास दिला, मात्र त्याला अवगत असलेल्या मार्शल आर्ट कलेने त्याने सर्वांचा पराभव केलाच पण त्याचा इतका प्रभाव गावातील लोकांवर पडला की त्यांनीही कुंग फू आत्मसात केले.