केवळ ९६ तास ऑक्सिजन अन्...; सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासात ३ धोके कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:48 PM2024-08-24T15:48:56+5:302024-08-24T15:55:49+5:30

सुनीता अन् बुश विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले होते. यामध्ये सुनीता या स्पेसक्राफ्टच्या पायलट होत्या. त्यांच्यासोबत गेलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) ८ दिवसांच्या वास्तव्यानंतर दोघेही पृथ्वीवर परतणार होते.

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुश विल्मोर हे स्पेसक्राफ्टमधील बिघाडामुळे ८० दिवसांपासून स्पेस स्टेशनला अडकून पडले आहेत. हे २ अंतराळवीर परत येणार की नाही हे आता २४ सप्टेंबरनंतरच ठरवले जाईल असं नासानं म्हटलं आहे. स्टारलाइनरमधून अंतराळवीरांना परत आणण्यात तीन मोठे धोके असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.

नाही, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर खाण्यापिण्याचे, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंची कमतरता नाही. १४ ऑगस्ट २०२४ ला प्रोग्रेस एमएस २८ नावाच्या कार्गो रिसप्लाय स्पेसशिपमधून स्पेस स्टेशनला ३ टन जेवण, कपडे, इंधन, मेडिकल आणि साफसफाईच्या वस्तू पाठवल्या आहेत.

अंतराळवीर श्वास सोडत असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचा वापर करून सुमारे ५०% ऑक्सिजनचा पुनर्वापर केला जातो. सौर पॅनेलमधून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन केले जाते, जेणेकरून अंतराळवीरांना ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. अंतराळवीरांच्या शरीराची दुर्गंधी ही एक मोठी समस्या आहे यामुळे स्पेस स्टेशनची हवा श्वास घेण्यासारखी नसते. त्यासाठी नायट्रोजन पाण्यात मिसळले जाते, ज्यामुळे ताजी हवा तयार होते.

नाही, माल पोहोचवणारी ही स्पेसशिप सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. स्पेस स्टेशनवर कपडे धुण्याची सुविधा नाही. कपडे आणि इतर वापरलेल्या वस्तूंचा कचरा साचत राहतो. जेव्हा नवीन मालवाहू जहाज ISS वर येते तेव्हा जुने मालवाहू जहाज ISS पासून वेगळे केले जाते यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. तिथे ते सुरक्षितपणे जाळले जाते.

NASA ने २२ ऑगस्ट रोजी केलेल्या निवेदनानुसार, आमचे आणि बोईंग तज्ञ अंतराळवीरांच्या परतीसाठी डेटा विश्लेषण करत आहेत. हा रिव्ह्यू २४ ऑगस्टला पूर्ण होईपर्यंत सुनीता आणि विल्मोर यांना स्टारलाइनरद्वारे परत आणले जाईल की नाही हे सांगता येणार नाही असं नासानं सांगितले.

अमेरिकेच्या मिलिटरी स्पेस सिस्टीमचे माजी कमांडर रुडी रिडॉल्फी यांनी स्टारलाइनरमधून अंतराळवीरांच्या परतीच्या धोक्याबाबत ३ शक्यता वर्तवल्या आहेत.

केवळ ९६ तास ऑक्सिजनसह अंतराळात अडकणे - ISS वर आवश्यक तेवढा ऑक्सिजन तयार केला जाऊ शकतो, परंतु परतीच्या वेळी अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या स्पेसक्राफ्ट कॅप्सूलमध्ये फक्त ९६ तास ऑक्सिजन असेल. जर तेव्हा अवकाशयान चुकीच्या पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात शिरले तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. चुकीमुळे अंतराळयान वातावरणाशी टक्कर होऊन अवकाशातील कक्षेत परत जाईल. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अंतराळवीरांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश न केल्यास..- जर स्पेसक्राफ्टची दिशा चुकीच्या वळणावर गेली तर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकणार नाही. अशा परिस्थितीत कॅप्सूल अनिश्चित काळासाठी अवकाशात राहील.

स्पेसक्राफ्ट जळून वाफ होणे - जर अवकाशयान पृथ्वीच्या वातावरणात खूप उंच दिशेने शिरले, तर हवेतील घर्षण आणि परिणामी उष्णतेमुळे स्टारलाइनरची हीट शील्ड निकामी होऊ शकते. यामुळे अवकाशयान पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वी जळू शकते आणि वाफ होऊ शकते अशा स्थितीत अंतराळवीरांचा मृत्यू निश्चित आहे.

जर स्टारलाइनरकडून परतीचा प्लॅन रद्द झाला तर नासाचा एकच बॅकअप प्लॅन आहे. SpaceX चे क्रू-9 ड्रॅगन मिशन. या अंतर्गत पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये ४ अंतराळवीरांना ISS मध्ये पाठवले जात आहे. या चार अंतराळवीरांना फेब्रुवारी २०२५ पर्यंत ISS वर राहायचे आहे. जर सुनीता आणि विल्मोर स्टारलाइनरवरून परत येऊ शकले नाहीत तर नासा क्रू-9 अंतर्गत ड्रॅगनमध्ये फक्त २ अंतराळवीर पाठवेल. हे दोघेही फेब्रुवारीपर्यंत सुनीता आणि विल्मोरसोबत स्पेसस्टेशनवर राहतील आणि परतीच्या प्रवासात सुनीता या दोघांसोबत पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.

टॅग्स :नासाNASA