facts about coronavirus raises questions about China kkg
CoronaVirus: कोरोना पसरला की पसरवला?; 'या' ७ गोष्टी वाचून तुम्हीही विचारात पडाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:13 PM2020-04-08T18:13:03+5:302020-04-08T18:26:04+5:30Join usJoin usNext सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. आतापर्यंत १४ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ८३ हजारांच्या पुढे गेला आहे. चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला आणि इथूनच कोरोना जगभरात पोहोचला. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीला कोरोनाचा इतका मोठा फटका बसतोय. यातील जर्मनी वगळता सर्वच देशांमधील मृतांचा आकडा चीनमधील मृतांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. चीननं कोरोनावर जवळपास नियंत्रण मिळवलंय. वुहानमधील लॉकडाऊनदेखील हटवण्यात आला आहे. चीननं कोरोनावर मिळवलेलं नियंत्रण आणि कोरोनाचा युरोप आणि अमेरिकेला बसलेला फटका लक्षात घेता कोरोना हे चीनचं कारस्थान आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चीनमधील प्रसारमाध्यमं सरकार नियंत्रित आहेत. त्यामुळे त्यातून येणारी माहिती किती खरी आहे, याबद्दल संपूर्ण जगाला शंका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यावर चीनमध्ये घडलेल्या घटना लक्षात घेतल्यास संशयाला जागा आहे. कदाचित या गोष्टींवर चीन सरकार कधीच काही बोलणार नाही. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर डॉ. ली वेनलियांग यांनी त्याबद्दल जगाला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला. वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनामुळेच ली यांचा मृत्यू झाला. वन्य प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना माणसांच्या संपर्कात आल्याचं चीनच्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं चौकशीतून समोर आणलं. चीनच्या वुहानमध्ये हुआनान बाजार आहे. तिथे प्राण्यांचं मांस विकलं जातं. मात्र या बाजाराबद्दल चीननं अद्याप चकार शब्द काढलेला नाही. चीनच्या हुबेईमधील आरोग्य आयोगानं १ जानेवारीला कोरोना विषाणूवर सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्याचे आदेश दिले होते. याशिवाय कोरोनाचे सगळे नमुने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग यांना कोरोनाची माहिती केव्हा मिळाली, त्यांना ती कधी दिली गेली, याचाही तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. ७ जानेवारीला कोरोना संदर्भात सूचना दिल्या होत्याचं जिंगपिंग यांनी ३ फेब्रुवारीला केलेल्या एका भाषणात सांगितलं. मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत तरी त्यांनी कोणत्याही भाषणात अशा सूचना केल्याची नोंद सरकारी कागदपत्रांमध्ये नाही. वुहानमध्ये ७ ते १७ जानेवारी दरम्यान एकही नवा रुग्ण आढळून आला नाही, असं वृत्त चिनी माध्यमांनी दिलं. विशेष म्हणजे त्याआधी ५ जानेवारीपर्यंत वुहानमध्ये कोरोनाचे ५९ रुग्ण आढळून आले होते. ज्या १० दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, त्याच कालावधीत वुहानमध्ये काही महत्त्वाच्या राजकीय बैठकांचं सत्र सुरू होतं. त्याला टू सेशन्स म्हटलं जातं. वुहानमध्ये आयोजित टू सेशन्सला ७०० अधिकाऱ्यांसह सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकांच्या सत्रामुळे वुहानमधील परिस्थिती लपवली गेली का, हा प्रश्न उपस्थित होतो. ५९ रुग्ण आढळून आल्यानंतर पुढील १० दिवस एकही रुग्ण वुहानमध्ये आढळून आला नाही, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. वुहानचे महापौर झोऊ शानवांग यांची एक मुलाखत २७ जानेवारीला प्रसिद्ध झाली. आमच्या टीमनं कोरोनाबद्दलची माहिती योग्य वेळी दिला नाही, अशी कबुली त्यांनी मुलाखतीत दिली. २८ जानेवारीला सरकारी वाहिनी सीसीटीव्हीवर ही मुलाखत दाखवण्यात आली. चिनी वृत्तसंस्था शिन्वानं १० जानेवारीला कोरोनासंदर्भातलं वृत्त दिलं होतं. हा आजार नियंत्रणात आणण्यासारखा असल्याचं, तो फारसा गंभीर नसल्याचं शिन्वानं म्हटलं होतं. हा आजार संसर्गजन्य नसल्याचंही शिन्वानं नमूद केलं होतं. वुहानमध्ये कोरोनाचा पहिला बळी जाण्याच्या एक दिवस आधी शिन्वानं हे वृत्त दिलं होतं. चीनमधील माध्यमांवर सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे चीनमधील नेमकी परिस्थिती फारशी जगासमोर येत नाही. चीननं कोरोनावर नियंत्रण कसं मिळवलं, चीनची लोकसंख्या इतकी जास्त असताना त्यांना कोरोना कसा नियंत्रणात आणला, राजधानी बीजिंगला कोरोनाचा फटका कसा बसला नाही, असे प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. त्यामुळे चीनबद्दल शंका निर्माण झाली आहे. चीन सरकारनं कोरोना प्रकरण हाताळताना उचलेली अनेक पावलं, घेतलेले निर्णय यामुळे शंका घेण्यास वाव आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina